सावरगाव डुकरे येथे माजी आमदार राहुल बोंद्रे शेतकऱ्यांच्या रक्ताने लिहलेले निवेदन फाडले म्हणून अन्नत्याग आंदोलनाला बसले होते.तर राहुल बोंद्रे यांनी शेतकऱ्यांची जिल्हा केंद्रीय सहकारी बँक बुडवण्यात मोठा हात असल्याप्रकरणी व शेतकऱ्यांच्या जमिनी हडपून त्यावर आपल्या शैक्षणिक संस्था स्थापन केल्याप्रकरणी काही शेतकऱ्यांनी ‘राहुल बोन्द्रे’ यांच्याविरोधातच अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते.
सदर अन्नत्याग आंदोलन सुरू असताना माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या समर्थनासाठी, जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे माजी मॅनेजिंग डायरेक्टर पंढरीनाथ टेकाळे यांनी, जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या कर्जाशी राहुल बोन्द्रे यांचे संबंध नसून, राजकीय वैमनस्यातून राहुल बोंद्रेंचा संबंध जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या कर्जाशी जोडला जात असल्याचे आपल्या फेसबुक पोस्टमधून व्यक्त केले होते.
परन्तु या संदर्भात जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेला जिल्हा उपनिबंधक कार्यालय यांनी माहिती मागितली असता,राहुल बोंद्रे व कुटुंब यांच्याशी संलग्न संस्थाकडे सुमारे 99 कोटी 95 हजार एवढे कर्ज (मुद्दल+व्याज) अद्यापही बाकी असल्याचे जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेकडून प्रसारित पत्रामध्ये सांगण्यात आले.ही बातमी व हे पत्र समाज माध्यमांमध्ये प्रसारित होताच राहुल बोंद्रे यांनी सावरगाव येथील आपले आंदोलन लगेच उरकले.हे पत्र प्रसारित झाल्यानंतर जिल्हाभरातील शेतकऱ्यांना राहुल बोंद्रे यांच्याकडे असलेल्या कर्जाची,व या कर्जाच्या प्रचंड रकमेची माहिती झाल्याने,राहुल बोन्द्रे यांचे शेतकरी प्रेम बेगडी होते! असा संदेश संपूर्ण जिल्ह्यात पसरला व राहुल बोन्द्रे यांची खरी प्रतिमा शेतकरी विरोधीच असल्याची चर्चा संपूर्ण जिल्हाभरात झाली.
परंतु पंढरीनाथ टेकाळे यांनी हेतूपुरस्सर खोटी बातमी पेरून जिल्हा सहकारी बँकेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल, जिल्हा सहकारी बँकेने, पोलीस स्टेशन बुलढाणा शहर यांच्याकडे रीतसर लिखित तक्रार देऊन पंढरीनाथ टेकाळे याचेवर कार्यवाही करणे संदर्भात सूचित केले आहे.
राहुल बोंद्रे सत्ताधारी आमदार असतानाच पंढरीनाथ टेकाळे जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे एम.डी होते, त्यामुळे राहुल बोंद्रे यांचेकडे असलेले कर्ज, राहुल बोंद्रे यांच्या विषयी सहानुभूती निर्माण करण्यासाठी त्यांनी पेरलेली खोटी बातमी, यातून पंढरीनाथ टेकाळे यांचा या प्रकरणात काही हात तर नाही ना? अशी शंका उपस्थित केल्या जात आहे.




