“लंका जाळण्यासाठी” लंकेची मदत?
सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाच्या संभाव्य उमेदवार असलेल्या कुमारी गायत्री शिंगणे यांनी काल पारनेर येथे जाऊन अहमदनगर दक्षिण चे खासदार श्री ‘निलेश लंके ‘ यांची भेट घेतली.
विखे कुटुंबाच्याच परंपरागत मतदारसंघात संपूर्ण “विखे अहंकाराचे” दहन केल्यामुळे संपूर्ण देशभरात प्रसिद्धीस आलेले खा. निलेश लंके हे “सर्वसामान्य जनतेच्या हृदयाचा रांगड्या शब्दात ठाव घेणारे राजकारणी” म्हणून ओळखले जातात.
75 वर्ष विखे कुटुंबाचा गड मानला जाणारा दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघ जिंकून खासदार निलेश लंके यांनी,देशाच्या राजकारणात मोठा भूकंप घडवून आणला होता.हेच निलेश लंके डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात सिंदखेडराजा येथे प्रचार सभा घेण्याची दाट शक्यता आहे.त्यामुळे डॉ. सुजय विखे यांच्याप्रमाणेच डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचाही अद्याप पर्यंत अभेद्य असलेल्या गडाला,खासदार निलेश लंके यांच्या प्रचार सभेने त्याला तडे जावू शकतात! एवढे नक्की!
त्यामुळे गायत्री शिंगणे नियोजित पद्धतीने मागील काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार अमोल कोल्हे,तसेच आमदार रोहित दादा पवार यांच्या भेटी घेऊन,योग्य वेळी सत्ताबद्दल घडवण्यासाठी कार्यरत असल्याची चर्चा सुरु आहे तसेही गायत्री शिंगणे यांनी आपले मनसुबे जाहीर केले आहेत.



