23.5 C
New York
Wednesday, June 17, 2026

Buy now

spot_img
spot_img

चिखली मतदार संघात सुरु असलेल्या घडामोडीवर “विनायक सरनाईक” बरसले.

चिखली (प्रतिनिधी ता.२६) :- शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या प्रमुख उपस्थितीत चिखली विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक चिखलीतील मौनीबाबा संस्थान येथे पार पडली. याबैठकीत सोयाबीन-कापूस दरवाढ, पिकविमा, नुकसान भरपाई, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती यांसह शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात आंदोलनाची दिशा व विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी संदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी बोलतांना विनायक सरनाईक यांनी चिखली मतदार संघात निवडणुकांच्या तोंडावर सुरु असलेल्या राजकारणावर सडकुन टिका केली.

सरनाईक म्हणाले, आम्ही गेल्या पंधरा वर्षांपासून शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी यांच्या प्रश्नावर लढतोय आम्हाला कोणतीही निवडणूक लढवायची नव्हती तेंव्हा रविकांत तुपकर असतील किंवा आम्ही असो शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमकपणे रस्त्यावर उतरायचो, शेतकरी-कष्टकऱ्यांसाठी केलेल्या आनंदोलनाचे शेकडो गुन्हे आमच्यावर दखल आहेत. जिल्ह्यातील ज्या नेत्यांनी एकत्रीत येत बॅक बुडवली त्यांच्या विरोधात राण पेटवलं. नेत्याकडील थकबाकी भरुण न घेता कर्जदार शेतकऱ्यांची सक्तीची वसुली होत होती. तेव्हा आम्ही शेतकऱ्यांच्या बाजुने उभे होते. तेव्हा हे आज शेतकरी हितासाठी आंदोलन करणारे आंदोलक कुठे होते. तेव्हा का यांना शेतकऱ्यांचा कळवळा आला नाही…? तेव्हा यामधे आपल्याच पक्षाचे नेते आहे म्हणून हे नेते गप्प राहले का..?असा सवाल सरनाईक यांनी या बैठकीत उपस्थीत केला व सत्ताधारी व विरोधाकांचा समाचार घेतला…
आज काही नेते सोयाबीन – सोयाबीन, पिकविमा-पिकविमा करत आहे. ते नेते चाडेचार वर्षे कुठे होते. जेव्हा रविकांत तुपकर यांनी जिल्ह्यात पक्ष विरहीत मोर्चे काढले तेव्हा हे नेते का सहभागी झाले नाही. आम्ही चिखलीत पाच वर्षांपासून सतत आंदोलने करत होतो, तेव्हा हे नेते कुठे गेले होते…?तेव्हा निवडणूका नव्हत्या म्हणून मिस्टर इंडीया झाले होते का…?असा टोला सरनाईक यांनी लावला असुन आज जिल्यातील नेत्यांच्या तोंडी सोयाबीन, कापूस, पिकविमा शब्द येणे म्हणजेच हे रविकांत तुपकर यांच्या सततच्या आंदोलनाचे आणि शेतकऱ्यांनी लोकसभेला दाखवलेल्या एकजूटीचे यश आहे, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले. तर रविकांत तुपकर यांच्यावर बोलण्यापुर्वी १५ वर्ष तुम्ही कुठे होता, तुम्ही डायरेक्ट निवडणूकीत लोकांसमोर आला हे जनता विसरली नाही. तुपकरांच्या आंदोलनामधून शेतकऱ्यांना काय मिळाले हे सर्वश्रुत आहे. परंतु तुम्ही जे आंदोलने करता यामधे फक्त राजकारण दिसते आणी टिकेची झोड दिसते… तुम्हाला जर खरचच वाटत असेल शेतकऱ्यांना न्याय मिळावा तर आम्ही तीन वर्षांपासून नारा दिला आहे. “पक्षाचे झेंडे बाजुला ठेवू… शेतकरी म्हणुन एकत्रीत येवू..!” तेव्हा तुम्ही शेतकऱ्यांच्या आंदोलनात का सहभागी झाले नाही, असा सवाल विनायक सरनाईकांनी उपस्थित करत सत्ताधारी व विरोधकांवर जोरदार टीका केली.

Related Articles

ताज्या बातम्या