14.5 C
New York
Saturday, April 18, 2026

Buy now

spot_img
spot_img

राहुल बोंद्रे यांच्या “दिल का हाल”,आणि ‘हवालदिल’ राहुल बोन्द्रे…

राहुल बोंद्रे यांच्या “दिल का हाल”,आणि ‘हवालदिल’ राहुल बोन्द्रे…

नुकतीच जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि चिखली विधानसभा मतदारसंघाचे माजी माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या हृदयावर मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया संपन्न झाली. शस्त्रक्रिया ‘छोटी’ होती परंतु राहुल बोंद्रे यांनी आपल्या सोशल मीडियावरून त्याची ‘मोठी बातमी’ केल्याने विरोधकही जागृत झाले. त्यात त्यांच्या एका माजी समर्थकाने ‘हृदय नसलेल्या माणसाची हृदयाची शस्त्रक्रिया’ अशी एक कमेंट बरीच व्हायरल झाली. त्याला प्रत्युत्तर म्हणून ‘सुंदर’ पाटलांच्या पोराने आम्ही तुमच्या पोरांना फुकट शिकवले आणि इतर काही असे प्रत्युत्तर दुसऱ्या एका पोस्टद्वारे व्हायरल केले. नंतर पाटलांनी ती पोस्ट डिलीट केली परंतु तोपर्यंत त्याच्यावर आणखी काही कमेंट्स येऊन गेल्या होत्या. त्या अर्थाने माजी माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या “दिल का हाल” चिखलीत चर्चिला गेला.

तीन दिवसापूर्वी चिखली मध्ये आमदार श्वेता महाले पाटील यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या देवा भाऊ नागरी सहकारी पतसंस्थेचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन झाले या उद्घाटन कार्यक्रमानंतर सचिन शिंगणे, अमडापूरचे विशाल देशमुख आणि श्री विष्णू पाटील व इतर बऱ्याच अगोदर काँग्रेसशी जुळलेल्या लोकांचे भाजपामध्ये पक्षप्रवेश झाले.यातील बहुतांश लोकांनी काँग्रेसचे स्थानिक नेतृत्व म्हणजे माजी माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे करत प्रवेश केला. राहुल बोंद्रे यांचे ग्रामीण भागातील हात मानल्या जाणाऱ्या या लोकांच्या भाजप प्रवेशामुळे राहुल बोंद्रे नक्कीच ‘हवालदिल’ झाले असतील याबाबत शंका नाही. परंतु हे राजकारण आहे यामध्ये अशा गोष्टी होत राहतात. रेखाताई खेडेकर, नरेंद्र खेडेकर यांच्या राजकीय आयुष्याला राहुल बोंद्रे यांच्यामुळे स्वल्पविराम लागले होते आता श्वेताताईंच्या उदयामुळे राहुल बोंद्रे हेही त्यांच्या पंक्तीत जाऊन बसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नगरपरिषदेच्या निवडणुकीअगोदर “हाल ए दिल ” सांगण्यासाठी राहुल बोन्द्रे काय करतात हे पाहणे मजेशीर ठरेल…

Related Articles

ताज्या बातम्या