14.5 C
New York
Saturday, April 18, 2026

Buy now

spot_img
spot_img

चिखली शहरात आज रंगणार भाजपा महायुतीच्या महादहीहंडीचा थरार…

चिखली शहरात आज बॉलीवूड सेलिब्रिटींच्या उपस्थितीत तसेच राजकीय क्षेत्रातील प्रमुख पाहुण्यांच्या हजेरीत रंगणार दहीहंडीचा महासोहळा..

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य दिव्य स्वरूपामध्ये आमदार सौ.श्वेता महाले यांच्या वतीने महायुतीच्या महादहिहडीचे आयोजन, चिखली शहरामध्ये करण्यात आले आहे.

चिखली शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात महायुती दहीहंडीच्या दमादार सोहळ्याचे आयोजन आज करण्यात आले असून, मोठ्या प्रमाणामध्ये व्यवस्था या ठिकाणी साकारण्यात आली असून भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे.

नुकत्याच संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळी मध्ये आमदार श्वेता महाले यांनी विजय मिळवला. आणि यानंतरचा आनंदोत्सव साजरा करण्याचा या वर्षीचा हा पहिलाच उत्सव. त्यातच विरोधी पक्षाच्या दहीहंडी उत्सवाचे नरम गरम पडसाद माहिती पडले असून अद्यापही त्यांच्या दहीहंडी उत्सवा संदर्भात कुठलीच माहिती प्रसारित झाल्याचे दिसले नाही.

त्यामुळेच ही दहीहंडी विशेष आकर्षणाचा विषय ठरणार…!

Related Articles

ताज्या बातम्या