14.5 C
New York
Saturday, April 18, 2026

Buy now

spot_img
spot_img

भाजप युवा मोर्चा आयोजित चिखलीतील दहीहंडी उत्साहात पार…

भाजप युवा मोर्चा आयोजित चिखलीतील दहीहंडी उत्साहात पार…

जीवनात पडल्यानंतर परत उठून नवी उंची गाठायला दहीहंडी शिकवते… ना. रक्षाताई खडसे

 

दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा महायुतीच्या महा दहीहंडीचे आयोजन आज गोकुळाष्टमीच्या पावन मुहूर्तावरती चिखली येथे करण्यात आले होते. दहीहंडीच्या या पावन आनंदमय कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर दहीहंडीचे रीतसर पूजन करून दहीहंडीच्या या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाव्हणे म्हणून केंद्रीय आयुष् मंत्री ना. प्रतापराव जाधव होते…

 

गोकुळाष्टमीच्या मनापासून शुभेच्छा देत आ. सौ. श्वेता महाले यांनी प्रास्ताविक सादर केले. “दहीहंडी हा सण हा तरुणांसाठी उत्सवाचा सण आहे, तरुणांमधले जे काही वाद असतील, जे काही गैरसमज असतील ते सगळे वाद, गैरसमज या ठिकाणी दूर होऊन सगळ्यांनी भगवान श्रीकृष्णाचा जो जन्म आहे तो जन्मोत्सवामध्ये साजरा करायचा असतो आणि त्या अनुषंगाने आपण दरवर्षी आपले आपसातले सगळे वाद तंटे विसरून प्रत्येक जन्माष्टमीला चिखली शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये एकत्र येऊन विकासाची दहीहंडी फोडतो, तमाम शिवप्रेमींची इच्छा होती की आपल्या चिखली शहरांमध्ये छत्रपतींचा जो उभा 1985 पासून असलेला पुतळा आहे तो अश्वारूढ असला पाहिजे आपले, गेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी चिखली शहरातील सर्व शिवभक्तांनी, शिवप्रेमींनी आपल्याकडे मागणी केली होती, त्यानुसार दुसऱ्यांदा आमदार म्हणून नियुक्त झाल्यानंतर त्वरित आपण शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे काम सुरू केले आहे. विरोधकांनी काही चुकीच्या गोष्टी पसरवून त्याचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला.

 

नामदार रक्षाताई खडसे पण आमदार प्रतापरावजी जाधव यांचीही उपस्थिती या महादही हंडीला लाभली. नामदार रक्षाताई खडसे यांनी दहीहंडीचा उत्सव ही भारताची संस्कृती असून या उत्सवातून भगवान श्रीकृष्णाने वेगवेगळ्या लीलांच्या माध्यमातून लोकांना जे संदेश द्यायचे काम केलेले आहे त्यामध्ये जीवन उत्साहाने जगले पाहिजे दहीहंडीच्या माध्यमातून आपण वर चढायला शिकतो पडायला शिकतो आणि परत उठायला शिकतो हीच गणिते आयुष्याला लावायची असतात आणि कितीही अपयशाला तरी परत उठून त्याच गतीने पुढे जायचं असतं असा संदेश भगवान श्रीकृष्णाने दहीहंडीच्या माध्यमातून आपल्याला दिला आहे असे रक्षाताई खडसे म्हणाल्या.

 

नामदार प्रतापराव जाधव यांनी आपल्या भाषणामध्ये दहीहंडीला महाराष्ट्र राज्यामध्ये खेळाचा दर्जा प्राप्त झाला असून महाराष्ट्रामध्ये खेळले जाणारे आपले पारंपरिक खेळ,त्याला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे आणि महाराष्ट्र मधील ग्रामीण भागातील वेगवेगळ्या भागातील खेळाडू पारंपरिक खेळाच्या माध्यमातून पुढे गेले पाहिजे त्यामुळे दहीहंडीचा हा उत्सव एका दिवसापुरता साजरा न करता छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना आदर्श मानून व या देशाच्या युवा पिढीने आपली ताकद ओळखून हा भारत विकसित भारत बनवण्यासाठी प्रयत्न करत राहिले पाहिजे असा संदेश दिला.

 

चिखलीतील दहीहंडीच्या या उत्सवाला प्रमुख आकर्षण म्हणून सिने अभिनेत्री स्नेहा उलाल, मराठी सृष्टीतील आघाडीची तारका तेजश्री प्रधान,आणि प्रसिद्ध अँकर यशा पाळणकर लाभल्या होत्या.

 

दहीहंडी आपल्याला शिकवते की, एकत्र आल्यावर कुठलीही उंची गाठता येते.तसेच तुम्हा सगळ्या युवांचा जोश आणि प्रेम आमदार श्वेता ताईसोबत दिसत असल्याने तुमच्या, आमच्या आवडत्या आमदार श्वेता महाले ताई त्यांच्या राजकीय जीवनात अपेक्षित उंची गाठून लवकरच मंत्रीपदाची हंडी फोडतील असा आशावाद व्यक्त केला.

 

डीजेच्या तालावर थिरकत अतिशय चैतन्यमय वातावरणात ही दहीहंडी पार पडली. हजारो तरुण-तरुणी संगीताच्या तालावर धुंद होऊन नाचत होत्या याप्रसंगी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता त्यामुळे कुठल्याही प्रकारची काहीही चुकीची घटना घडून आली नाही. व ही चिखलीची महादहीहंडी उत्साहात पार पडली.

Related Articles

ताज्या बातम्या