…..आवाहन….
संपूर्ण चिखली विधानसभा मतदारसंघातील चिखली शहर व परिसरातील अनेक गावांमध्ये सतत सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते बंद झाले आहेत, काही ग्रामीण व शहरी भागातील घरांमध्ये पाणी घुसले आहे
आणि बऱ्याच गरीब मायमाऊल्यांच्या घराच्या भिंतीही कोसळल्या आहेत, या नैसर्गिक आपत्तीमध्ये आपले तहसीलदार, गटविकास अधिकारी, व मुख्याधिकारी यांना बाधित जनतेसाठी मदतकार्य पुरवण्यासंबंधी सूचना करण्यात आलेल्या आहेतच, शासनाकडून तात्काळ मदत व पुनर्वसन सुरू होईलच बाधित भागाचे पंचनामे ही त्वरित सुरू होतील
परंतु अशावेळी मतदारसंघातील सर्व शहरातील व ग्रामीण भागातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनाहि माझी नम्र विनंती आहे की, अशा कठीण प्रसंगात आपण सर्वांनी जात, धर्म, पंथ,पक्ष अशी कुठलीही गोष्ट मनात न आणता फक्त भारतीय म्हणून रस्त्यावर उतरायचे आहे. आणि आवश्यकतेप्रमाणे व कुवतीप्रमाणे आपल्या भागातील नागरिकांची तन-मन, धनाने शक्य होईल ती मदत करायची आहे…
अशा प्रकारचे आवाहन चिखलीचे आमदार सौ श्वेता महाले पाटील यांनी केले आहे.



