श्वेता महाले शेतकऱ्यांच्या बांधावर…
सानुग्रह अनुदानासह त्वरित नुकसानीचे पंचनामे सरकारला पाठवा… आ. सौ. श्वेता महाले पाटील.
चिखली विधानसभा मतदारसंघातील पांढरदेव, अंबाशी, वरखेड, पेनसावंगी, भोरसा भोरसी,घानमोड मानमोड ,करतवाडी व महिमळ या ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर काल चिखली येथे महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे आले असता कार्यक्रम स्थळीच आपल्या भाषणामध्ये चिखली विधानसभा मतदारसंघाच्या कर्तव्य तत्पर आमदार सौ श्वेता महाले पाटील यांनी अतिवृष्टी व काही दिवसापूर्वी हुमणी अळी या दोन नैसर्गिक संकटांनी शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून या नुकसानीची भरपाई शासनाकडून त्वरित त्यांना प्राप्त व्हावी याकरता आपल्या भाषणातच महसूल मंत्र्यांना साकडे घातले होते.आज सकाळपासुन आ. श्वेता महाले यांनी संपूर्ण अधिकाऱ्यांच्या टीमला सोबत घेऊन या अतिवृष्टीग्रस्त भागात प्रत्येक ठिकाणी जाऊन नुकसानीची पाहणी केली व अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या.
चिखली तालुक्यातील अंबाशी या गावांमध्ये पाझर तलाव फुटून खूप नुकसान झाले आहे त्यामुळे या पाझर तलावाची संरक्षक भिंत तयार करण्यासाठी त्वरित अभियंत्यांनी कामाला लागावे अशा सूचना आ. सौ श्वेता महाले यांनी दिल्या.
पांढरदेव येथील अनेक शेतकऱ्यांचे बांध फुटल्यामुळे नुकसान झालेले आहे काही शेतकऱ्यांची तर जमीन खरडून गेली आहे, गावातील दोन्ही पूल या अतिवृष्टीने वाहून गेले आहे या पुलांसाठी प्रशासनाकडून तात्काळ मदत करण्यात येत आहे अशा वेळेस या शेतकऱ्यांसोबत शासन व प्रशासन दोन्ही उभे असल्याचे आमदार सौ श्वेता महाले पाटील म्हणाल्या.
नुकसानग्रस्त गावातील सर्व शेतांचा सरसकट सर्वे करण्याचे आदेश आमदार श्वेता महाले पाटील यांनी दिला असून अधिकाऱ्यांनी सुट्टीची कोणतीही पर्वा न करता लगेच सर्वे सुरू केले आहेत. अशा वेळेस ज्या शेतांची सर्वे होतील त्या सर्व शेतकरी व शेती गटाची यादी ग्रामपंचायत येथे लावण्यात येणार असून सर्वेतील नुकसानग्रस्त क्षेत्राबाबत एखाद्याची तक्रार असेल तर त्याने ती लगेच ग्रामपंचायतला व संबंधित अधिकाऱ्याकडे नोंदवायची आहे, गावातील सर्व नागरिकांच्या सहमतीनेच शासनाकडे नुकसान मागणीचा प्रस्ताव टाकणार असल्याबाबत आमदार श्वेता महाले पाटील यांनी सुचित केले.
याप्रसंगी नायब तहसीलदार श्री वीर, तालुका कृषी अधिकारी श्री सुरडकर, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री पोपळे, कृषी अधिकारी श्री कपिल कंकाळ व संबंधित सर्व गावांचे तलाठी ग्रामसेवक व कोतवाल हे हजर होते. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांना त्वरित सर्वे करून द्यावेत,या सर्वेच्या याद्या ग्रामपंचायतला लावाव्यात व कोणाचे काही आक्षेप असतील तर ते त्वरित नोंदवून घ्यावे, कुणावरही अन्याय होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी! या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना आमदार श्वेता महाले यांच्याकडून देण्यात आल्या
त्याचबरोबर नुकसानग्रस्त सर्व गावातील जास्त नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना तहसील कडून सानुग्रह अनुदान म्हणून रुपये 5000 त्वरित देण्यात यावे अशा सूचनाही आमदार श्वेता महाले यांनी संबंधितांना दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बंडू अंभोरे, लक्ष्मण अंभोरे,श्रीकृष्ण अंभोरे,सरपंच चेतन म्हस्के, वरखेडचे सरपंच श्री विनोद कणखर, गणेश भगत, देविदास कणखर, समाधान कणखर,संदीप म्हस्के,राजेंद्र म्हस्के, अनुप म्हस्के,अमोल म्हस्के,तेजराव खेडेकर,योगेश म्हस्के, गणेश म्हस्के, रमेश कणखर,भारत सोळंकी, विष्णू मुंडे, रमेश आकाळ, गजानन पाटील,प्रदीप भुसारी, संतोष आकाळ, श्रीराम आकाळ, बद्रीनारायण काळे,अरुण म्हस्के, संदीप म्हस्के व महीमळ येथील श्री हरिभाऊ येवले व गजानन पडघान व इतर कार्यकर्ते व पदाधिकारी हजर होते.



