18.9 C
New York
Friday, April 24, 2026

Buy now

spot_img
spot_img

महसूल मंत्र्यांनी केली लाडक्या बहिणीची “लाडू तुला”…

महसूल मंत्र्यांनी केली लाडक्या बहिणीची “लाडू तुला”…

चिखली मध्ये देवा भाऊ नागरी सहकारी पतसंस्था या लाडक्या बहिणींच्या पतसंस्थेचे उद्घाटन करण्यासाठी आलेल्या महसूलमंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या विविध निर्णयामुळे चिखली शहरातील त्या निर्णयांचा फायदा झालेल्या मुस्लिम बांधवांनी नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांची लाडू तुला करण्याचे ठरवले होते.

 त्यानुसार उद्घाटनाचा नियोजित कार्यक्रम संपल्यानंतर मंत्रिमहोदयांनी लाडक्या बहिणी व महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांना सभेमध्ये संबोधित केले आणि त्यानंतर महसूल विभागाशी संबंधित तक्रारी समस्या व निवेदने स्वीकारली. त्यानंतर माननीय महसूल मंत्र्यांना लाडू तुला करण्यासाठी आमंत्रित केले असता त्यांनी आपण उपस्थित असलेल्या कार्यक्रमाचा संदर्भ देऊन या कार्यक्रमांमध्ये लाडक्या बहिणीची तुला झाली पाहिजे असा विचार मांडला. आणि त्यांच्या या उदार विचारावर लगेच अंमलबजावणी देखील झाली.

 उपस्थित लाडक्या बहिणी पैकी देवा भाऊ नागरी सहकारी लाडकी बहीण महिला पतसंस्था, चिखलीच्या संचालिका असलेल्या आणि लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचा कशाप्रकारे फायदा झाला हे मंचावर उपस्थित असलेल्या मान्यवरांना सांगणाऱ्या व त्यासाठी शासनाचे आभार व्यक्त करणाऱ्या सौ संगीता गजानन दुधाळे यांची लाडू तुला करावी असे नामदार महसूल मंत्री श्री बावनकुळे यांनी सुचवले.

कार्यकर्त्यांकडून मान्यवरांची लाडू तुला हा प्रसंग महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पाहायला मिळतो. परंतु मंत्री महोदय असलेल्या मान्यवराकडून एका सामान्य लाडक्या बहिणीची लाडू तुला हा प्रसंग विशेष ठरला. रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी महसूल मंत्र्यांनी लाडक्या बहिणीची लाडू तुला करून एक आदर्श प्रस्थापित केल्याचे दिसून आले.

Related Articles

ताज्या बातम्या