4.2 C
New York
Thursday, April 9, 2026

Buy now

spot_img
spot_img

घटक पक्ष आणि अपक्ष यांना संपवण्याचा सरकारचा डाव….हा निवडणूक निकाल “स्पॅम”….. सौ. प्रेमलता सोनोने

घटक पक्ष आणि अपक्ष यांना संपवण्याचा सरकारचा डाव….सौ. प्रेमलता सोनोने

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि त्याचे निकालही जाहीर झाले आहेत.कुणालाही अपेक्षा नसताना महायुतीने 240 पर्यंत जागा जिंकून प्रचंड मोठा विजय प्राप्त केला.पण महायुतीच्या या विजयावर अनेक स्तरातून शंका उपस्थित केल्या जात आहेत.महाविकास आघाडीने हा ई. व्ही. एम. चा विजय असल्याचे सांगत हा पराभव नाकारला होता.महाविकास आघाडी सोडून इतर घटक पक्ष आणि अपक्ष यांनाही या निवडणूक निकालामध्ये काही गोष्टी संशयास्पद वाटत आहेत.

बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील स्वराज्य पक्षाच्या उमेदवार सौ. प्रेमलता सोनोने यांनीही या निवडणूक निकालाला “स्पॅम” असल्याचे संबोधत “असा निवडणूक निकाल महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच पाहण्यात आला असे त्या म्हणाल्या. अगदी यशवंतराव चव्हाण यांच्या काळातील पहिल्या निवडणुकीत देखील संपूर्ण काँग्रेसची सत्ता महाराष्ट्रात कधी आली नाही.अगदी महाराष्ट्रातील पहिल्या निवडणुकीत देखील “घटक पक्ष व अपक्ष” यांचा निवडणुकीतील एक वाटा नेहमीच राहिला आहे.जिंकले नसतील तरी कुणाच्या तोंडून विजय खेचून दुसऱ्याला विजयी करण्याचे सामर्थ्य प्रदान करणारी मते नेहमीच घटक पक्ष आणी अपक्ष यांना मिळत होती.

या निवडणुकीमध्ये मात्र अगदी लोकप्रिय उमेदवारांना देखील 500 चा आकडा देखील गाठणे कठीण झाले.अगदी बच्चु कडू यांच्यासारख्या दिग्गज असणाऱ्या पण मुख्य दोन सोडून वेगळा पक्ष असणाऱ्या माणसाला देखील पराभव पत्करावा लागत असेल आणी छत्रपती यांच्या वंशजांना मानणारा लाखो करोडो लोकांचा समुदाय संपूर्ण महाराष्ट्रात असतांना त्यांनी सामाजिक बाबी सुधारण्यासाठी स्थापन केलेल्या स्वराज्य पक्षाला तीन आकडी संख्याबळ मिळवतांना देखील दमछाक व्हावी ही कल्पना न केलेली बरी.

त्यामुळे हा निकाल संपूर्णपणे महायुतीला पोषक होईल असाच सेट केलेला होता का? असाच संशय निर्माण होत आहे असे प्रेमलता सोनोने पाटील म्हणाल्या.

Related Articles

ताज्या बातम्या