अमडापूर पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध दारू, गुटखा,वरलीचे साम्राज्य….पोलिसांची शांती संशयास्पद ,
मा. जिल्हा पोलीस अधीक्षक व मा. मुख्यमंत्री यांना देणार निवेदन.
बुलढाणा(राजेंद्र घोराडे): चिखली तालुक्यातील अमडापूर येथे स्वतंत्र पोलीस स्टेशन कार्यरत असतांना खुद्द अमडापूर येथून प्रचंड प्रमाणात गुटखा चिखली व बुलढाणा तालुक्यातील प्रत्येक गावागावात पोहचवला जातोय.
शासनाकडून गुटखा व तत्सम पदार्थांची विक्री कधीच बंद करण्यात आली असली तरीही प्रत्येक पान टपरीवर, प्रत्येक किराणा दुकानवर गुटखा सर्रासपणे विकला जातो.गावागावामध्ये कॅन्सर पोहोचवणाऱ्या या गुटखा किंग यांनी स्वतः, या गुटखा विक्रीच्या भरोशावर स्वतःचे महाल निर्माण केलेले आहेत.
या गुटखा विकणाऱ्या लोकांचा पॅटर्न मात्र सारखाच आहे, अमडापूर सारख्या गावातून सकाळी पाच ते सहाच्या दरम्यान पर राज्यातील पासिंग असलेल्या दुचाकी घेऊन, एका दुचाकी वर पाच ते सहा गुटख्याच्या मोठ्या बॅगा ठेवून हे लोक सकाळी दोन तासात संपूर्ण बुलढाणा व चिखली या दोन तालुक्यांमध्ये प्रचंड प्रमाणावर गुटखा विक्री करून मोकळे होतात.एका विशिष्ट समाजातील, प्रचंड वेगाने दुचाकी चालवणाऱ्या या मुलांकडे पाहून🚭 तुमची आमची सर्वांची पिढी सडवणारा हा “गुटखा आतंकवाद” संपवण्यासाठी पोलिसांनी कधीच पावले उचलायला हवी होती परंतु एवढे काही होत असतानाही अमडापूर पोलिसांची शांती अनेक शंका उपस्थित करीत आहे.
त्यातच चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ श्वेताताई महाले या राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय असल्यामुळे,व खुद्द त्यांचे पती गृहमंत्री यांचे स्वीय सहाय्यक असल्याने, त्यांच्या मतदारसंघातातिल मोठ्या गावापैकी एक असलेल्या अमडापूरमध्ये पिढी नासवणारा गुटखा बंद झालाच पाहिजे, गुटक्यांच्या विक्रीचे अड्डे उध्वस्त झालेच पाहिजेत अशी मागणी सर्वसामान्य लोकांकंडून होत आहे.
येत्या आठवड्यामध्ये महाराष्ट्राचे आगामी मुख्यमंत्री व बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कार्यालय यांना या अवैध गुटखा विक्रीचे अड्डे उध्वस्त करण्यासाठी निवेदन देणार असल्याचे बुलढाणा बचाव कृती समितीमार्फत सांगण्यात आले आहे.



