4.2 C
New York
Thursday, April 9, 2026

Buy now

spot_img
spot_img

वैभव सूर्यवंशी झाला वयाच्या 13 व्या वर्षी करोडपती क्रिकेटपटू..

वैभव सूर्यवंशी झाला वयाच्या 13 व्या वर्षी करोडपती क्रिकेटपटू..

वैभव सूर्यवंशी या 13 वर्षीय फलंदाजाने इतिहास रचला आहे. बिहारचा फलंदाज वैभव सूर्यवंशी आयपीएल लिलावात विकला जाणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. या खेळाडूला विकत घेण्यासाठी राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये स्पर्धा लागली होती, ज्यामध्ये अखेर राजस्थान रॉयल्सने बाजी मारली. राजस्थानने वैभव सूर्यवंशीसाठी 1.10 कोटी मोजत आपल्या ताफ्यात सामील केले.

वैभव 13 वर्षांचा असून तो भारताच्या अंडर-19 संघातून खेळला आहे. लिलावात विकल्या जाण्यापूर्वीच, वैभवने इतिहास रचला होता, जेव्हा तो आयपीएल लिलावात सहभागी होणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला होता. दिल्ली कॅपिटल्सने या तरुण स्टारसाठी पहिली बोली लावली, ज्याची मूळ किंमत 30 लाख रुपये होते. दिल्ली कॅपिटल्सने त्याच्यासाठी 1 कोटी रुपयांपर्यंत बोली लावली, पण शेवटी राजस्थानने बाजी मारली.

Related Articles

ताज्या बातम्या