जिल्हा परिषद बुलढाणा येथे संविधान दिन उत्साहात साजरा…
बुलढाना: जिल्हा परिषद बुलढाणा येथे दि. 26 नोव्हेबर 2024 ते 26 जानेवारी 2025 पर्यत साजरा करण्यात येणाऱ्या घर घर संविधान, संविनधानाचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.बुलढाणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.गुलाब खरात हे होते.
कार्यक्रमाची सुरवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून करण्यात आली, नंतर भारतीय राज्यघटनेच्या प्रास्तिाविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.त्यांनतर अधिकारी वर्गातुन श्री.बाळासाहेब खरात(शिक्षणाधिकारी प्राथ.) यांनी मनोगत व्यक्त केले तर कर्मचारी वर्गातुन श्री.सतीष गायकवाड,विशाल वानखेडे,हेमा पाचपोळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना श्री गुलाब खरात (मु.का.अ जि प बुलढाणा ) यांनी संविधानाची नितीमुल्ये हि फक्त पुस्तकात न ठेवता दैंनदिन जीवनात ही तत्वे आत्मसात केली पाहीजे व संविधानाचा जागर व संविधान अमृत महोत्सव हा दरदिवशी साजरा करण्याचे आवाहन केले.

मा.श्री.गुलाब खरात यांच्या संकल्पनेतुन संविधान दिनानिमित्त संविधानावर आधारीत प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली होती, व तीन प्रश्नांची अचुक उत्तरे देणाऱ्या कर्मचाऱ्यास यांना भारतीय संविधानाची प्रत भेट म्हणुन देण्यात आली. यामध्ये श्री.आकाश नवघरे,श्रीमती आरती गवई,कु,प्रतिक्षा दळे,अजित चव्हाण हे कर्मचारी प्रश्नमंजुषा चे विजेते ठरले त्यांना श्री गुलाब खरात यांच्या हस्ते संविधानाची प्रत भेट म्हणुन देण्यात आली.
कार्यक्रमाला श्री.बी.एम.मोहन (अति.मु.का.अ.) श्री.आशिष पवार (उप.मु.का.अ.साप्रवि) ,श्री.प्रकाशराठोड(मु.ले.वि.अ.) श्री.बाळासाहेब खरात (शिक्षणाधिकारी प्राथ.)श्री.राहुल जाधव(का.अ.ग्रा.पा.पु),श्री.अमोल गीते(जि.आ.अ),श्री.संजय इंगळे (उप मु.का.अ.ग्रा.प.)श्रीमती वैशाली ठग (शिक्षणाधिकारी प्राथ.) श्रीमती तृप्ती खेडेकर (जि.पशु.स.अ.) आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुत्रसंचालन श्री विशाल वानखेडे व आभार प्रदर्शन श्री उमेश जैन(उप शिक्षणाधिकारी) यांनी केले.



