लाडक्या बहिणींनो….. सध्या 1500/- रु…… 2100/- एप्रिल नंतर पाहू….
राज्यात सरकारने १ जुलैपासून दर महिन्याला लाडक्या बहिणींना १५०० रुपये दिले आहे. त्यानंतर सरकार पुन्हा आल्यावर महिलांना २१०० रुपये देणार असल्याचे वचन दिले होते. त्यामुळे आता बहिणींना २१०० रुपये देणार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर केलं आहे.पण लगेच ही रक्कम वाढून दिली जाणार नाही तर यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजुरी घ्यावी लागणार आहे.
सध्या महिलांना १५०० रुपयेच मिळणार आहेत.व पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद झाल्यावर म्हणजे एप्रिल महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यानंतर त्यापुढील महिन्यापासून कदाचित महिलांना २१०० रुपये दिले जाणार आहे.



