4.2 C
New York
Thursday, April 9, 2026

Buy now

spot_img
spot_img

चिखली आणि बुलढाण्यात महायुतीच्या विजयाचा संकल्प करा – आ. संजय गायकवाड.

चिखली आणि बुलढाण्यात महायुतीच्या विजयाचा संकल्प करा – आ. संजय गायकवाड़

धाड येथे महायुतीच्या मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद

चिखली : राज्यातल्या महायुती सरकारने प्रत्येक समाज घटकासाठी व वेगवेगळ्या जाती समूहासाठी राबवलेल्या कल्याणकारी योजनांचा लाभ या विधानसभा निवडणुकीत महायुतीला निश्चितच होणार आहे. चिखली आणि बुलढाणा मतदारसंघात सुद्धा महायुतीसाठी अतिशय चांगले वातावरण असून कार्यकर्त्यांनी या वातावरणाचे विजयात रूपांतर करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावे. बुलढाणा मतदारसंघातील शिवसेना कार्यकर्त्यांनी एक दिवस चिखली मतदारसंघात आ. श्वेताताई महाले यांचा प्रचार करावा अशी सूचना मी माझ्या पक्षातील सहकाऱ्यांना केली आहे. बुलढाण्यात माझ्या धनुष्यबाण निशाणी समोरील बटन दाबून व चिखलीत श्वेताताईंच्या कमळ चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला विजय करा व महायुतीचे सरकार राज्यात पुन्हा सत्तेवर आणा असे आवाहन बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केले. धाड येथे २७ ऑक्टोबर रोजी आयोजित महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर आ. श्वेताताई महाले यांच्यासह पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष भाई विजय गवई, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज दांडगे व महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या