दिवाळी गोड त्याची,ज्याच्या शेताला वर्षभर पाणीपुरवठा…. मागेल त्याला शेततळे आणी ठिबक व तुषार सिंचनासाठी अनुदाने यातून आमच्या शेताला मिळतोय वर्षभर पाणीपुरवठा….
काय असते दिवाळी…. अचानक आलेल्या संकटात आपल्या मदतीसाठी कुणीतरी येते,आणी आपल्या घरातील आधार कुणाच्यातरी सहकार्याने दवाखान्यातून बरा होऊन पुन्हा आपल्या घराचा आधार बनतो…ही असते खरी दिवाळी…पंतप्रधान आयुष्यमान व महात्मा फुले मधे सर्वांना पाच लाख रु. पर्यंतचे उपचार मोफत आहे….आमदार श्वेताताई महाले यांनी याव्यतिरिक्त सुमारे 33 कोटी र. चे उपचार माझा भाऊ,माझी आई,माझी बहीण,माझा मुलगा यांना उपलब्ध करून दिलेत. पण ताईंनी माझी जात कधी विचारली नाही….
माझ्या घरातील महिन्याच्या तीन हजार रुपये किराण्याचे अर्धे पैसे माझी पत्नी “लाडकी बहीण” म्हणून भरतेय… श्वेताताईंनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी स्वतःच्या खर्चातून कॅम्प लावले होते.माझ्या गावात ग्रामदूत म्हणून आलेल्या त्या पोराने सगळी योजना आम्हाला घरीच तयार करून दिली.आणी आमच्याकडून पैसेदेखील नाही घेतले.
आईचे डोळ्याचे ऑपरेशन झाल्यानंतर तिला धुराचा त्रास होऊ नये म्हणून गॅस सिलेंडर घ्यावा की नाही हा विचार सुरु असतानाच…त्या आमदार बाईंनी फक्त 100 रु. मध्ये गॅस सिलेंडर घरी पोहचवण्याची व्यवस्था केली. पहिला गॅस मोफत तर होताच पण दिवाळीत या माझ्या बहिणीने सर्वांना तीन सिलेंडर मोफत देण्याची घोषणा केली आणी माझ्या दरमहिन्याच्या खर्चामधून माझे पैसेही शिल्लक राहायला लागले..पण माझ्यासोबत गल्लीतील मारोती कांबळे, इस्माईल चाचा,उमेश राजपूत आणी पंजाबराव पाटील यांच्याही घरी दिवाळी आणी दिवाळीसोबत आंनदाचा शिधा पोहचला,आम्ही सर्व खरच आंनदी आहोत कारण आता दिवाळीत आमच्यावर कर्ज करण्याची पाळी आली नाही.
शेजारचा फारूक आणी विठोबा वर्षभर बांधकाम मजुरी करतात,पण दिवाळीला फारूकच्या बहिणीने पंतप्रधान आवास योजनेमधून त्यांना व विठोबाला बांधून मिळालेल्या घरामध्ये, नवीन संसारबाटली संचामध्ये मिळालेल्या घरसामानाची एवढी सुंदर मांडणी केलेली पाहून विठोबाची. पत्नी …..”बाई आमदार असली की बाईची काळजी घेतेच,बघ माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी रोखीने खात्यात पैसेही आलेत बाई”हे सांगितल आणी दोघेही आंनदाने हसायला लागल्या.
निसर्गाने नेहमीप्रमाणे आपला लहरीपणा दाखवलाच, एन सोयाबीन सोंगायला आणी काढायला आली आणी पावसाने रुद्ररूप घेतले,हाता तोंडाशी आलेला घास आता हिरावला जातो की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली होती.पण काही नुकसान झालेच पण लगेच दुसऱ्या दिवशी बांधावर आ. श्वेताताई दिसल्या आमचा आमदार आमच्या बांधावर दिसला यातच आम्हाला समाधान होत.पण आमच्या झालेल्या नुकसानीसाठी आमची आमदार कृषिमंत्रीशी ही भांडत होती हे आम्हाला टीव्हीवर पाहायला मिळाल.काही दिवसात आमच्या सरकारने आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीकविम्याचे पैसे पडल्याचे आमच्या लक्षात आले.आमची “ताई” आम्हाला न सांगताही आमच्यासाठी सरकारसोबत ही भांडू शकते.
किसान सन्मान निधिमधून असो की नमो महासन्मान योजना असो,की पिक नुकसानीच्या वेळी पीकविम्यामधून असो प्रत्येक अडचणीच्या क्षणाला माझ्या घरात काही कमी पडू नये,म्हणून काळजी करणाऱ्या माझ्या ताईने आम्हा गरिबांसाठी तालुक्यात 5220 घरकुले मंजूर केली आहे.आणी आमच्या शेतात फवारणी करण्यासाठी 4500 पंपही आपल्या तालुक्यात शेतकरी बांधवाना वाटप केली.
अशा शंभर बाबी सांगता येतील,माझी बहीण मला सतत काहीतरी देण्यासाठी तत्पर असतेच या माझ्या ताईला भाऊबीजेची ओवाळणी देण्याची वेळ आता माझी आहे.माझे मत माझ्या ताईला.माझे मत श्वेताताईला…



