4.2 C
New York
Thursday, April 9, 2026

Buy now

spot_img
spot_img

काँग्रेस फक्त मुस्लिमधार्जीने राजकारण करत आहे….. राहुल बोन्द्रे यांचा जाती जातीमध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न ?..रोहित खेडेकर

माजी आमदार राहुल बोन्द्रे यांनी चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार याद्यामध्ये घोळ होत असल्याबद्दल एक आठवडाभर आकांडतांडव केले. “लांडगा आला रे आला” या उक्तिप्रमाने चिखली मतदारसंघांमध्ये “मतदार याद्यांच्या घोळाची आवई” उठवून देणाऱ्या माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी एका पत्रकाराच्या सांगण्यावरुन आपल्या राज्यस्तरीय नेत्यांच्या कानावर ही बातमी टाकली व हलक्या कानाच्या महाविकास आघाडीतील नेत्यांनीही पत्रकारपरिषद घेऊन “लांडगा आला रे आला ” सुरु केले.पण त्यांनी सुरु केलेला हा रडीचा डाव, त्यांच्यावरच उलटण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.असे युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख रोहित खेडेकर हे चिखलीमध्ये बोलताना म्हणाले.

रोहित खेडेकर यांनी राहुल बोन्द्रे हे मुस्लिमधार्जीने राजकारण करत असून ते जातीय तेढ निर्माण करीत असल्याचा आरोप केला,पुढे बोलताना रोहित खेडेकर म्हणाले की “मुस्लिम वोट बँक” आपल्याकडे वळावी यासाठी “चिखलीतील मोहऱ्याचा” वापर करून राज्यस्तरावर मुस्लिम वोटर आपल्या बाजूने वळवण्यासाठी,व मुस्लिम आणि मागासवर्गीय बांधवांनी एम.आय.एम.,प्रकाश आंबेडकर साहेब यांचा वंचित बहुजन आघाडी पक्ष, तसेच भीम आर्मी सारखे स्वतःची अस्मिता जपून राजकारण करणारे पक्ष यांना किंवा महायुतीतील घटक पक्ष यांना मतदान करू नये व ही एकगठ्ठा मते काँग्रेसप्रणीत महाविकास आघाडीतील घटक पक्षांना मिळावी यासाठी आघाडीतील काही विघ्नसंतोषी लोकांनीच हे षडयंत्र रचले असल्याची चर्चा जोरात सुरु आहे.सत्य लवकरच समोर येईल.

हे गलिच्छ राजकारण करण्यामागे महाविकास आघाडीला जास्त फायदा होईल हे जाणून असल्याने काँग्रेसी नेते अशा समाजविघातक चाली नेहमीच खेळतात. जातीय वोट बँक च्या राजकारणानेच काँग्रेसने स्वातंत्र्यांनतर साठ वर्ष इंग्रजापेक्षाही हीन दर्जाचे राजकारण करून सत्ता हस्तगत केली आहे.त्यामुळे काँग्रेसला हा “पत्ता” पुन्हा वापरून सत्ता तर मिळवायची नाही? याचा विचार सर्व जाती धर्मातील मनाने भारतीय असलेल्या नागरिकांनी करावा असे आवाहन युवा सेना उपजिल्हाप्रमुख रोहित खेडेकर यांनी केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या