“शेती” शेतकऱ्याचा जीव, “पांधन रस्ता” शेताची जीवनवाहिनी…..काय म्हणतात “शेलसूरवासी”
पांधण रस्ते तयार करताना घोटाळा झाला म्हणून उर बडवून घेणाऱ्या माजी आमदार राहुल बोंद्रे यांना,पांधन रस्ता तयार करण्यासाठी अद्याप कुणालाही सरकारकडून एक पैसाही मिळालेला नाही हे सत्य पचवणे कठीण जात आहे. परंतु या पांधन रस्त्यांच्या निर्मितीमुळे हजारो शेतकऱ्यांच्या दुवा आ. श्वेताताई महाले यांना मिळत आहेत.पेरणीच्या दिवसांमध्ये भर पावसाळ्यात आपल्या शेतात पेरणी करण्यासाठी जायचे, तर बाजारातून घरी आणलेली बी- बियाणे, खते इत्यादी निविष्ठा शेतात घेऊन जाण्यासाठी आणी मालाची निगा राखण्यासाठी, फवारणी करताना तसेच शेवटी शेतिमाल घरी आणण्यासाठी ट्रॅक्टर वा बैलगाडी या दळणवळणाच्या साधनाचा वापर करावा लागतो.योग्य रस्ता नसेल तर पर्यायाने निसर्गाच्या लहरीपणामुळे पावसाने बऱ्याच वेळा मालाची खूप हानी होते तसेच बऱ्याच ठिकाणी रस्ता चांगला नसल्याने बैल मोडल्याची ही अनेक उदाहरणे पाहायला मिळतात.कधीकधी यामध्ये मनुष्यहानी सुद्धा होते.यासाठी या रस्त्याचे अपरिमित महत्व असते.यामध्ये अशा अनेक बाबी सांगितल्या जाऊ शकतात.
थोडसं राजकारण बाजूला सारून जर शेतकरी म्हणून आपल्या मतदारांकडे पाहिले, तर ही आहे यादी”शेलसुर पांधन रस्त्याचा” फायदा झालेल्या माझ्या शेतकरी राजाची….श्री रमेश शिवचरण काळे, श्रीमती रेणुका राजेंद्र काळे, शेषराव राजेंद्र काळे, गणेश गंडे, परमेश्वर दामोदर काळे, बाबुराव सुसर, नारायण सुसर, श्री एकनाथ कापसे, प्रकाश कापसे, राम कापसे,शाम कापसे सर, रोडुबा रिंढे, सुरेश विनायक रिंढे, भीमराव रिंढे,विष्णू रिंढे,संतोष रिंढे, रवीअन्ना काशिनाथ काळे,सुभाष् इंगळे, प्रल्हाद कांबळे सर, दिगंबर रिंढे, मनोहर रामकृष्ण रिंढे, रामेश्वर मनोहर रिंढे, मारुती काका इंगळे, सोपान कापसे, एडवोकेट मयूर देशमुख, संजय जानकीराम काळे, मदन जानकीराम काळे, रामेश्वर जानकीराम काळे, सुनील भगवान धुंदळे, जयराम पिंपळे सर, महादू काळे, प्रकाश रामकृष्ण उंबरे, भगवान रामचंद्र धारणकर, कोकिळाताई विश्वनाथ काळे, अशोक रामकृष्ण कापसे, गजानन रामचंद्र काळे, संतोष बाबुराव पवळ, मनोहर व्यवहारे, भीमरावजी कदम, शेषराव कदम, भाऊसाहेब कदम, प्रकाश शिंदे, राजेंद्र जगन्नाथ काळे, विजय साहेबराव रिंढे, अजय साहेबराव रिंढे, विष्णुपंत पाटील सर, मारुती रंगनाथ रिंढे, मनोहर रंगनाथ रिंढे, ज्ञानेश्वर नवले, श्री बाहेकर, सतीश काळे, नारायण उकर्डाजी काळे.
वरील सर्व मंडळी राजकारण निरपेक्ष आमदार श्वेताताई महाले यांच्या मदतीने तयार झालेल्या पांधण रस्त्याची प्रत्यक्ष लाभार्थी असून, अप्रत्यक्ष लाभार्थ्यांची संख्या कित्येक पटीने वाढू शकते, ही फक्त एका गावातील एका पांधन रस्त्याचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी आहे.शेतकऱ्याप्रती संवेदनशीलता दाखवून शेतकरी हाच विकासामध्ये प्रमुख लाभार्थी असला पाहिजे! ही भावना जपणाऱ्या आमदार श्वेताताई महालेे यांच्या प्रति वरील सर्व शेतकऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.



