4.2 C
New York
Thursday, April 9, 2026

Buy now

spot_img
spot_img

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची मलाई खाल्ली कोणी? हजारो मराठा/कुणबी तरुण उद्योजकांना कर्जाच्या खाईत ढकलून लुटण्याचे पाप कुणाचे ? …शिवराज पाटील

महाराष्ट्र राज्यातील मराठा/कुणबी समाजातील तरुण/तरुणींना स्वतःचा एखादा उद्योग सुरु करण्यासाठी “शून्य टक्के व्याज दराने” कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाद्वारे सुरु करण्यात आलेली महत्वाची अशी एक योजना आहे.या योजनेअंतर्गत जे तरुण/तरुणी स्वतःचा एखादा उद्योग सुरु करण्यासाठी तसेच सुरु असलेला एखाद्या उद्योगाचा विस्तार करण्यासाठी इच्छुक आहेत अशा तरुणांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देते.

त्यासाठी काही प्रक्रिया आहे.महामंडळांनी जिल्ह्यातील काही बँकांना कर्ज देण्यासाठी या बँकांनी महामंडळाला केलेल्या लेखी विनंतीनुसार अधिकृत केले आहे.

तुम्ही बँक मधून घेतलेल्या कर्जावर आकारण्यात येणाऱ्या व्याजाची रक्कम हि महामंडळाद्वारे भरण्यात येते.म्हणजेच आपले कर्ज हे बिनव्याजी स्वरूपाचे होऊन जाते.

पण बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपल्या स्वतःचे खिसे भरण्यासाठी काही बँकांनी अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेचा भरमसाठ दुरुपयोग केला असून, शेकडो युवकांना व्याज परतावा योजनेचा फायदाच मिळालेला नाही, असा आरोप आमदार श्वेताताई महाले यांचे बंधू आणी भाजपा नेते शिवराज पाटील यांनी केला आहे.

बुलढाणा जिल्ह्यामध्ये बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक,चिखली अर्बन को-ऑपरेटिव बँक,आणि माजी आमदार राहुल बोन्द्रे यांची अनुराधा को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक यांनी महामंडळाला विनंती करून महामंडळाचे कर्जवाटप करण्यासाठी स्वतःला अधिकृत करून घेतले आहे.म्हणजे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाकडून कर्ज घेण्यासाठी आपल्या कर्जाची फाईल संबंधितांना या तीन बँकांकडे द्यावी लागते.

यापैकी जिल्हा केंद्रीय सहकारी बँक स्वतःच्या कर्जांनी डबघाईस आलेली असून,”जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेलाच राहुल बोंद्रे यांच्यासारख्या काही कर्जदारामुळे कर्ज घेण्याची वेळ आलेली आहे”.

परंतु भाऊंच्या को-ऑपरेटिव्ह बँकेने अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे कर्ज मंजूर करताना मात्र स्वतःच्या बँकेतून एकाच घरात दोन तर कधी तीन जणांनाही कर्ज वाटप केली आहे. ज्याला खरोखर उद्योग उभारणीसाठी कर्ज हवे आहे,त्याला विनातारण कर्ज मंजूर करण्याचा नियम असतांना मूळ नियमांना धाब्यावर बसवुन चिखलीमध्ये “भाऊंनी” फक्त कर्ज घ्या,आमच्या बँकेकडून घ्या आणी कर्ज फक्त आमच्याशी “संबंध” असणाऱ्यांच मिळेल अशाप्रकारे बऱ्याच मोठ्या प्रमाणावर “मलाई” खाल्ली असल्याची चर्चा जोरात सुरु आहे.

मराठा कुणबी समाजातील युवकांना उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज हवे असेल तर अगोदर “आपल्याला कर्ज मिळावे म्हणून भाऊंचे पाय धरावे लागतात”. नंतर भाऊंनी आशीर्वाद दिला की कर्जाची फाईल मंजूर केल्या जाते पण त्यासाठी बँकेचे शेअर खरेदी किंवा इतर अनेक शुल्लक बाबीसाठी ,भाऊंच्या आशीर्वादासाठी, बँक कर्मचाऱ्यांच्या मेहनतीसाठी” खर्च” करावा लागतो.एवढे करून भाऊंची मर्जी असेल तर कर्ज मिळते आणी कर्जाचे हप्ते सुरु होतात.मराठा कुणबी समाजातील युवक मुळातच प्रामाणिक असल्याने कर्जाचे संपूर्ण हप्ते भरतात, परंतु कर्जाचे पूर्ण हफ्ते भरल्यानंतरही व्याज परतावा योजनेचा लाभ यांना काही मिळत नाही,कारण व्याज परतावा योजनेतील व्याजाची सगळी रक्कम भाऊच्या बँकेने अगोदरच खाल्लेली असते.किमान 10 लाख रुपयाच्या कर्जावर वार्षिक 12 टक्केे दराने शेकडो/हजारो मराठा कुणबी समाजातील युवकांच्या घामाचे पैसे बँकेकडून वसुल केले जातात,पण मूळ योजनेत हे व्याज परत केले जावे अशी तरतूद असतानाही,व्याजाचा परतावा मात्र केला जात नाही.एका लाभार्थ्याचा किमान तीन लाख रुपये व्याज परतावा देणे अपेक्षित असतांना बँकेकडून तो दिला जात नाही असे आरोप होत आहेत.एका लाभार्थीचे तीन लाख तर शंभर किंवा हजार लाभार्थी असतील तर कोट्यावधी रु. काहीही न करता मराठा,कुणबी समाजातील गरजू असलेल्या युवकांचे कुणाच्या पदरात पडत आहेत?यासंबंधी सखोल चौकशी होण्याची गरज असल्याचे शिवराज पाटील म्हणाले.

Related Articles

ताज्या बातम्या