4.2 C
New York
Thursday, April 9, 2026

Buy now

spot_img
spot_img

लागता पराभवाची चाहूल ! बैचेन झालाय राहूल ….. श्वेता ताईंचे काम खराब करता येत नसल्यामुळे नाव खराब करायचा प्रयत्न राहुल बोंद्रे करत आहेत…. संतोष काळे.

आमदार असताना 10 वर्षात मतदार संघाचा कुठलाच विकास न केल्यामुळे पराभवाची चाहूल लागताच राहुल बोंद्रे यांच्याकडून श्वेता ताई महाले यांची प्रतिमा खराब करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न सुरु असल्याचे प्रतिपादन भाजपा युवा मोर्च्याचे तालुका अध्यक्ष संतोष काळे यांनी केले आहे.

माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी 2009-2019 या दहा वर्षाच्या कालावधी मध्ये चिखली मतदार संघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले… या कालावधी मध्ये 10 वर्ष आमदार असताना सुद्धा राहुल बोंद्रे हे मतदार संघासाठी ठोस तर सोडाच पण किरकोळ सुद्धा विकास करण्यात सपशेल अपयशी ठरलेले आहेत… 10 वर्षाच्या आमदारकीच्या काळात राहुल बोंद्रे यांच्यावर फक्त भ्रष्टाचाराचे आरोप होत राहिले मग त्यामागे “कष्टकरी शेतकऱ्यांची जिल्हा बँक बुडविने” असो की सहकारी सूतगिरणी चा विषय असो माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी सत्तेत असताना फक्त स्वतः चा अमाप फायदा करून घेतला…

कोणताही आमदार मंत्र्यांकडे जाताना मतदार संघात चांगला प्रकल्प कसा येईल, मतदार संघातील तरुणांना रोजगार कसा मिळेल, आपल्या मतदार संघाचा विकास कसा होईल यासाठी मंत्र्यांकडे पाठपुरावा करत असतो परंतु राहुल बोंद्रे आमदार असताना फक्त स्वतः ची शैक्षणिक संस्थेला आर्थिक फायदा होण्यासाठी वेगवेगळी मान्यता कशी मिळेल , वैयक्तिक आर्थिक फायदा कसा होईल ह्याच गोष्टींचा पाठपुरावा संबंधित मंत्र्यांकडे करत राहिले.

त्यांना ना मतदार संघाच्या विकासाशी घेणे होते ना सामान्य जनतेशि,ना जनतेच्या प्रश्नांशी …

याउलट 2019 मध्ये आमदार झाल्यापासून श्वेताताई महाले यांच्या 5 वर्षांच्या कारकिर्दीतील 2.5 वर्ष हे कोरोना काळात गेले परंतु महायुतीची सत्ता आल्यानंतर या अडीच वर्षाची कसर मात्र श्वेताताई महाले यांनी भरून काढली… राहिलेल्या अडीच वर्षात मात्र श्वेताताई महाले यांनी मतदार संघाचा “न भूतो न भविष्यती” विकास केला हे स्वतः माजी आमदार राहुल बोंद्रे आणि त्यांचे कार्यकर्ते सुद्धा खाजगीत मान्य करतात

प्रत्येक गाव खेड्यात राहुल बोंद्रेंच्या कारकीर्दीत 2-3 लाखाच्या वर निधी मिळाला नाही तिथे श्वेता ताई यांनी कोटी – कोटी ची उड्डाणे घेऊन निधी दिला आणि याच विकासाच्या जोरावर आमदार श्वेता ताई यांनी आपली पुढची आमदारकी सोपी करून घेतली आहे. शेवटी जनता विकासासोबत जात असते…त्यात श्वेताताई यांची स्वच्छ असलेली प्रतिमा सुद्धा कारणीभूत आहे…याउलट राहुल बोंद्रे यांच्यावर शेतकऱ्यांची जिल्हा बँक बुडविल्याचे आरोप सातत्याने होत असतात आणि खुद्द जिल्हा बँकेने सुद्धा राहुल बोंद्रे यांच्या संस्थांकडे तब्बल 99 कोटी रुपये म्हणजे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पिकविम्याच्या एकूण रकमेपेक्षा सुद्धा जास्त रक्कम थकीत असल्याचे पत्र दिले आहे त्यामुळे चिखली मतदार संघात राहुल बोंद्रे हे पुरते बॅकफूटवर गेल्याचे दिसून येत आहे.त्यामुुळे राहुल बोंद्रे हे सध्या अखंड आरोप करत आहे.  पराभवाची चाहूल राहुल बोंद्रे याना लागलेली असून संपुष्टात आलेले राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी राहुल बोंद्रे यांचे धडपड चाललेली असून श्वेता ताई यांच्या विकासाला उत्तर नसल्यामुळेच राहुल बोंद्रे हे श्वेता ताई महाले यांच्यावर जाणीवपूर्वक आरोप करून त्यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष संतोष काळे यांनी केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या