राजेंद्र शिंगणे यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली?
डॉक्टर राजेंद्र शिंगणे मागील बऱ्याच दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट मध्ये जायला उत्सुक असल्याचे सगळ्यांनाच माहिती होते.परंतु आता डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
नाईलाजास्तव राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जावे लागल्यानेे अस्वस्थ असलेले डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश करण्याचे ठरवले असल्याचे खात्रीलायक वृत्त बुलढाणा दर्पणच्या हाती लागले असून 16 ऑक्टोबर रोजी त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची खात्रीची बातमी त्यांच्या अधिनस्त सूत्राकडून प्राप्त झाली आहे.
त्याना वरिष्ठाकडून देखील हिरवा सिग्नल मिळाल्याने ते “तुतारी” वाजवणारा माणूस या चिन्हावर सिंदखेडराजा मतदारसंघात लढतील हे जवळजवळ स्पष्ट झाले आहे.अशा वेळेस शरदचंद्र पवार गटाकडून सिंदखेडराजा मतदारसंघांमध्ये लढण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मुलाखती दिल्या, त्या सर्वांचा काय पवित्रा असेल हे पाहणे मनोरंजनाचे असेल.



