“चिखलीतील आंदोलने” फक्त फोटोसेशन पुरतीच….. सौ. श्वेताताई महाले.

पुणे(बुलढाणा दर्पण): चिखलीमध्ये विरोधकांकडून होणारी आंदोलने ही फक्त फोटोसेशन पुरतीच मर्यादित असतात.आंदोलने आयोजीत करायची, त्यात मुद्दाम काहीतरी बेकायदेशीरपणा करायचा, आणि मग पोलीस आले की, मोठ्या “आंदोलक असल्याच्या शैलीत फोटो” काढून मोकळे व्हायचे, नंतर तेच फोटो सोशल मीडियावर टाकून आंदोलनाचा मोठा गवगवा करायचा.हाच प्रकार विरोधकाकडून सातत्याने चालू असल्याचा टोला आमदार श्वेताताई महाले यांनी नाव न घेता माजी आमदार राहुल बोन्द्रे यांना लगावला.
“पुणे येथे आयोजित चिखलीकरांशी संवाद” या कार्यक्रमांमध्ये बोलताना आमदार श्वेताताई यांनी,सत्तेतील आमदार म्हणून मिळालेल्या दोन वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी केलल्या विकास कामाची चर्चा केलीच सोबतच “विरोधकांची फेक आंदोलने” याविषयी सविस्तर फिरक्या घेतल्या.
पुण्यातील भोसरी मतदारसंघांमध्ये भोसरीचे आमदार महेश दादा लांडगे यांच्या प्रमुख उपस्तिथीमध्ये ” शिक्षण, व्यवसाय, नोकरी इत्यादी कारणांसाठी पुण्यामध्ये स्थायिक झालेल्या चिखलीकरांशी आमदार श्वेताताई महाले संवाद साधत होत्या. पुण्यामध्ये स्थायिक झालेल्या हजारो लोकांच्या उपस्थितीत, आपलेपणाच्या भावनेने एकत्र आलेल्या हजारो चिखलीकर कम पुणेकर लोकांशी संवाद साधण्यासाठी आ. श्वेताताई महाले पुण्यामध्ये आलेल्या होत्या.अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त संख्येने एकत्र जमलेल्या चिखलीकरांकडून, मिळालेले प्रेम पाहून आमदार श्वेता महाले यांनी “असेच प्रेम कायम असू द्या” अशी प्रेमळ साद घातली व त्याला चिखलीच्या नागरिकांनी आपल्या उत्स्पुर्त प्रतिसादाने उत्तर दिले.

एक आमदार म्हणून कोणत्याही भौगोलिक परिस्थितीत न अडकता, जिथे जिथे चिखली विधानसभा मतदारसंघातील जनता असेल,त्या सर्वांना जातपात,पक्ष भेद न मानता मदत करणे हे माझे कर्तव्य आहे!आणी हाच माझ्या पक्षाचाही दृष्टीकोन आहे! असे आ. महाले म्हणाल्या.
पुण्यामध्ये आयोजीत या संवाद कार्यक्रमाला,पुण्यातील हजारो युवक,युवती व नागरीक यांनी आपल्या कुटुंबासह हजेरी लावली आणी या कार्यक्रमाला “कौटुंबिक सोहळ्याची” शोभा आणली.त्यामुळे मायभूमीपासून दूर राहूनही मूळ चिखलीच्या असलेल्या असलेल्या आपल्या कुटुंबातील सदस्याकडून मिळालेले प्रेम पाहून आमदार आ. श्वेता महाले यांनी कृतज्ञता व्यक्त केली.




