14.5 C
New York
Saturday, April 18, 2026

Buy now

spot_img
spot_img

राहुल बोंद्रे नैराश्यग्रस्त.!मतदार संघात कामे होताना पाहून त्यांना स्वतःचे कमिशन आठवत असावे…. डॉ. कृष्णकुमार सपकाळ

चिखली(बुलढाणा दर्पण):  जिल्हा सहकारी बँकेच्या उघड झालेल्या भ्रष्टाचाराने माजी आमदार राहुल बोंद्रे यांची मानसिक अवस्था अत्यंत डळमळीत झाली असून, आता ते तोंडाला येईल ते बडबडत आहेत.अशा तीव्र शब्दात भाजपा जिल्हा सचिव डॉ. कृष्णकुमार सपकाळ यांनी माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्यावर टीका केली आहे.

शेतकऱ्यांबद्दल खोटा कळवळा आणून दोन दिवसाच्या उपोषणाला ते बसले होते. जिल्हा सहकारी केंद्रीय बँकेने भ्रष्टाचाराची नव्यान्नव कोटी रक्कम प्रसारित करताच, बेमुदत असलेले उपोषण 48 तासाच्या आत गुंडाळले गेले. खरे म्हणजे उपोषण 48 तासाचेच ठरलेले  होते, कारण 48 तासानंतर मुकुल वासनीक यांच्या वाढदिवसाला दिल्लीला जाऊन त्यांची पायधुळ मस्तकी घ्यायची ठरली होती, तिकडे तिकीट मिळवण्यासाठी पाय चाटून होताच, आपल्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाला बगल देण्यासाठी आमदार श्वेताताई महाले यांच्यावर भ्रष्टाचारांचे आरोप याांनी सुरु केले आहे.

चिखली विधानसभा मतदारसंघात सुरू असलेली विकासाची कामे दिसली की माजी आमदार यांना आपण घेत असलेले कमिशन आठवत असावे! त्यामुळे आपल्यासारखेच दुसरेही कमिशन खातात, असे त्यांना वाटते.खरे म्हणजे ते व त्यांच्या कमिशनखोर ठेकेदारांची दुकाने विद्याधर महाले साहेब यांनी बंद केल्यामुळे त्यांचा विद्याधर महाले यांच्यावर राग आहे.राजकीय कारकीर्द संपन्याच्या वाटेवर असल्याने नैराश्यातून त्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत असेही डॉ. सपकाळ म्हणाले

एवढा प्रचंड निधी आमदार श्वेता ताई महाले यांनी मतदारसंघात ओढून आणला आहे तो पाहून जळफळाट होत असलेले माजी आमदार सरळसरळ जिल्हा बँकेच्या कर्जाबाबत बोलण्याचे टाळण्यासाठी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करत असून, या अगोदर प्रत्येक कार्यक्रमात त्यांनी जशी स्वतःची फजिती करून घेतली आहे तसेच या भ्रष्टाचार आरोपावरही त्यांची फजिती होणार आहे,स्वतःला सुज्ञ परंपराचा पाईक समजणाऱ्या राहुल बोन्द्रे यांनी आमदार श्वेताताई यांचेवर केलेल्या भ्रष्टाचाराचे आरोप पुराव्यानिशी सिद्ध करावे,असे आम्ही आवाहन करत आहोत,असेही श्री सपकाळ म्हणाले.

दोनदा आमदार राहिल्यानंतरही ज्या माणसाला स्वतःच्या तिकिटाची ही खात्री देता येत नाही, तो भ्रष्टाचारी मानुस स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी दुसऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करीत आहे. अगोदर शेतकऱ्यांच्या 99 कोटीचे काय? हे सांगा! असा प्रश्न डॉ. कृष्णकुमार सपकाळ यांनी विचारला आहे.

Related Articles

ताज्या बातम्या