देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी(17 सप्टेंबर) यांचा वाढदिवस ते राष्ट्रपीता महात्मा गांधी यांची जयंती (2 ऑक्टोंबर) हा पंधरवडा सेवा पंधरवडा म्हणून शासनाद्वारे साजरा केला जातो.
चिखली मतदार संघातील प्रत्येक गावाला जास्तीत जास्त नागरी सुविधा मिळाव्यात यासाठी कटिबद्ध असलेल्या आमदार श्वेता ताई महाले यांनी काल चिखली तालुक्यातील इसोली येथे सुमारे 13 कोटी रु. च्या विकास कामाचे उदघाटन व भूमिपूजन केले.शहरी व ग्रामीण भागातील विकासाची दरी भरून काढण्यासाठी महाराष्ट्र शासन सतत कार्यरत असून त्यासाठीच शासन अहोरात्र प्रयत्न करत आहे.त्यामुळे महायुती सरकार ला कायम आशीर्वाद असू द्या.असे आवाहन आ. श्वेताताई महाले यांनी केले.
विविध विकास कामाचे उद्घाटन करण्याबरोबरच बांधकाम कामगारांच्या संसाराला हातभार लावण्यासाठीतानी इसोली येथे किचन सेट वाटप करण्यात आले.यामध्ये संसार उपयोगी भांडी सर्व बांधकाम कामगार बंधू-भगिनींना देण्यात आली.

याप्रसंगी सरपंच माणिकराव खरात, शेख अनिस भाई, सौ. ज्योतीताई सीताफळे, श्रीकिसन मामा कोकाटे, डॉ. राजेश दिघे, रामेश्वर शेळके, गवळी मामा, पुरुषोत्तम जाधव, डॉ. रईस, गजानन इंगळे, संतोष ठाकरे, महादेव उमाळे, राम जाधव, सुनील जुमडे, बंडूभाऊ खरात, श्याम वाकदकर, बद्रीभाऊ औटी, स्नेहल वानखेडे, विनोद सीताफळे तसेच इतर सरपंच, ग्राम पंचायत सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते व कामगार बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



