4.2 C
New York
Thursday, April 9, 2026

Buy now

spot_img
spot_img

धन्यवाद नरूभाऊ….! “मी पण आमदार” ही लोक चळवळ होईल…. सुनील पोफळे

लोकप्रतिनिधी हा मतदारसंघातील सर्व जनतेचा असतो, व जनता जर स्वतःमध्ये लोकप्रतिनिधी पाहत असेल तर तो लोकप्रतिनिधीचा विजय असतो.प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांनी म्हटल्याप्रमाणे, जर श्वेता ताई यांचा भाऊ आणि त्यांचे वडील हेही स्वतःला आमदार समजत असतील, तर या “मतदारसंघाची लेक” असलेल्या श्वेताताई यांना याचा अभिमान असेल,आणी तसाच अभिमान नरूभाऊ यांना ही असायला हवा.आमदार श्वेताताई महाले या दरवर्षी रक्षाबंधनाच्या निमित्ताने एक लाख बंधूना राखी पाठवत असतात.त्यामुळे फक्त चिखली विधानसभा मतदारसंघांमध्येच “ताई ” यांचे एक लाख भाऊ आहेत,ते सर्व नेहमी आपल्या गावातील लोकांच्या समस्या घेऊन “ताईपर्यंत” येत असतात.सगळ्यांना वेळ देणे जरी शक्य नसेल तरी प्रत्येकाची समस्या सुटणे आवश्यक असते,या कामी ताई यांचे “हजारो भाऊ” त्यांना नेहमी मदतच करतात.त्यामुळे आमच्यातही “आमदार” असल्याची भावना जागृत केल्याबद्दल आम्ही प्रा. नरेंद्र खेडेकर यांचे आभारच मानतो.त्यांनीही स्वतःला “आमदार” समजून लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी “ताईंना” मदत करावी,असेही आम्हाला वाटते.

सर्व बंधू,भगिनी यांच्यात आणी आमदार यांच्यामध्ये काही फरक नसून, ते सर्वच लोकप्रतिनिधी आहेत जर ही भावना “श्वेताताई महाले” निर्माण करू शकल्या असतिल, तर ही आमच्यासाठी *गौरवाची बाब* आहे.आणि याचे प्रतिबिंब म्हणून जर आदरणीय ताई व पक्षाने परवानगी दिली तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये “मी पण आमदार” ही टोपी घातलेले एक लाख “भाऊ” तुम्हाला मतदारसंघांमध्ये दिसतील.” व ” मी पण आमदार “ही एक लोकचळवळ बनेल  टोमणाही भाजपाचे चिखली तालुकाप्रमुख सुनील पोफळे यांनी लगावला.

Related Articles

ताज्या बातम्या