लावलेल्या फोटोमधील दोघाबद्दल ही बातमी नाही,तरी त्यांचे फोटो बातमीमध्ये का देण्यात आले?याचे उत्तर बातमीच्या शेवटी दिले आहे.
“राजकारण करताना डोक्यावर बर्फ आणी जिभेवर साखर ठेवावी लागते” असे म्हणतात.हा संदेश लिहणारा आणी ज्यांच्या कृतीतून हा संदेश लिहला गेला असेल ते सर्व स्वर्गलोकातून बुलढाणा जिल्ह्यातील राजकारणी लोकांचे कारणामे पाहून स्वतःच्या हाताने स्वतःच्या श्रीमुखात हाणून घेत असतील.
शिवसेना पक्षाची निर्मितीच मुळी राजकारणात जहाल पक्ष म्हणून झाली,त्यामुळे शिवसेनेत असलेल्या कार्यकर्त्या समाजाने नेता होईपर्यंत तरी थोड हिंसक असणे ही शिवसेनेत नेता होण्याची पूर्वअट आहे.याच परंपरेला साजेसे बुलढाणा आमदार संजय गायकवाड आहेत.पण नेता झाल्यावर तरी तोंडावर ताबा ठेवायचा असतो हे कळण्याईतपत शिक्षण त्यांना नाही,असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले आणी त्यात बहुंशी सत्यता आहे.
संजय गायकवाड यांनी काँग्रेसचे कुत्र्यांना चिरडून टाकू अशी धमकी दिली, आणि त्या धमकीला आपण कोणी घाबरत नाही हे दाखवून देण्यासाठी काँग्रेस संपूर्णपणे पेटून उठली.काँग्रेसचे राजकारण हे मुळात शांत व संयमी समजले जाते, पण संजय गायकवाड यांना विरोध करताना जयश्रीताई शेळके हे पूर्णपणे विसरल्या की काय?असे एक निवेदन देण्यासाठी चाललेली त्यांची तडफड पाहून वाटत होते.मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम हा नियोजित असतो आणि नियोजित कार्यक्रमांमध्ये उगीच “माझा हट्ट पुरवा” असा काही प्रकार करायचा नसतो.पण जयश्री ताईंनी ज्या प्रकारे महिला पोलिसाशी “कबड्डी” खेळून निवेदन देण्याचा प्रकार केला तो म्हणजे आमदार संजय गायकवाड यांना खुले चॅलेंज होते,की “हम किसी से नही डरते”.पण जयश्रीताई शेळके यांना करावी लागलेली झटापट हा चित्रपटातील “अनावश्यक सिन” होता असंच बऱ्याच जणांना वाटले.
काँग्रेस व शिंदे शिवसेना दोन्ही गटातील नेत्यांच्या, मागील पंधरा दिवसातील घडामोडींचा अभ्यास केला की एक गोष्ट मात्र नक्की जाणवली, अतिशय शांत समजल्या जाणाऱ्या बुलढाण्याला शांत सोज्वळ, संयमी व सुशिक्षित आमदार असणे खूप गरजेचे आहे.
आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या साडेचार वर्षाच्या कार्यकाळात काँग्रेस मधील संभाव्य असलेले जयश्रीताई, बंटी दादा, संजय राठोड यांना आपल्या वागणूक स्तरावर आणले,त्यामुळे साहजिक संजय गायकवाड कमी शिक्षित असूनही जिंकले असंच म्हणावे लागेल.उबाठा मधील जालिंदर बुधवत हेही संजय गायकवाड यांना समानार्थी आहेत.त्या तुलनेत उबाठा मधीलच डॉक्टर मधुसूदन सावळे हे संयम(23 वर्षांपासून एकाच पक्षात राहून तिकिटाची वाट बघत आहेत आणखी किती संयम ठेवणार ?),शिक्षण आणी वागण्याची पद्धत या बाबीमध्ये सर्व उमेदवारामध्ये वरच्या स्तरातील आहेत.उठा मधिलच् संदीप शेळके यांनीही अतिशय शांत,संयमी स्वभावाचे दर्शन घडवून जरा आश्चर्यचकित केले! लोकसभा पराभवानंतर ही संदीप शेळके यांच्या शांत प्रतिक्रिया आणी मागील तीन चार पंचवार्षिक विधानसभा निवडणुकीमध्ये तिकीट मागूनही न भेटल्याने अजूनही त्याच पक्षात राहून प्रतीक्षेत दिसणारे डॉ. सावळे ही चारित्र्याची अप्रतिम उदाहरणे आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट देणे हे जरी आपल्या हातात नसले तरी तिकिटाच्या लायकीचा कोण आहे हे ठरवण्याची लोकशाही पद्धत सर्व पक्षांनी अवलंबली पाहिजे, त्यात “थंड डोके” आणि “गोड जीभ” या दोन गोष्टींचा विशेष पेपर व्हायला हवा.सध्या तरी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील आजी आणि काही संभाव्य( या दोन पेपर मध्ये पूर्णपणे फेल आहेत)
वरील नेत्यांच्या हिंसक राजकीय कृतिचा निषेध म्हणून “बुलडाणा दर्पण” असल्या नेत्यांचा फोटो आपल्या या बातमीला लावणार नाही.



