बुलढाणा लोकसभा मतदारसंघात सतत चौथ्यांदा खासदार प्रतापराव जाधव यांना जनतेने विजयश्री प्रदान केल्यामुळे विरोधी उमेदवार प्रा नरेंद्र खेडेकर यांचे “मानसिक संतुलन” ढासळले आहे.आणि ते त्यांच्या “बेताल” वक्तव्यातून आपल्या निदर्शनास येत आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र खेडेकर हेच रविकांत तुपकर यांना ‘गळाभेट’ द्यायला रविकांत तुपकर यांच्या कार्यालयात गेले होते.त्याच तुपकरांच्या विरोधात परवा ‘महाविकास आघाडीने आयोजित केलेल्या व ‘फ्लॉप शो’ झालेल्या ‘शेतकरी संघर्ष मोर्चात’ नरूभाऊ बरळले.
आपली हार मान्य करायला मनाचा मोठेपणा हवा असतो , ‘कोत्या’ मनाच्या नरेंद्र खेडेकर यांना लोकसभा निवडणूक हरल्यांनंतर आपल्या पराभवाचे खापर इतरांवर फोडायला सुरुवात केली आहे.त्यामुळे देशाच्या मंत्रिपदावर असलेल्या सन्माननीय ना. प्रतापराव जाधव व त्यांच्या कुटुंबावरही ते भ्रष्टाचारासारखे आरोप करत आहेत.देशाचे मंत्रीपद आपल्या बुलढाण्यासारख्या जिल्ह्याला भेटणे ही आपल्यासाठी गौरवाची बाब आहे, पण पराभव पचवता न आल्याने वैफल्यग्रस्त नरेंद्र खेडेकर आणी टीम ,कधी रविकांत तूपकर ,कधी आ.श्वेता महाले,तर कधी ना. प्रतापराव जाधव यांच्यावर आरोप करत सुटले आहे.
लोकसभा पराभवानंतर नरेंद्र खेडेकर यांना फ्रस्ट्रेशन आले आहे, तरी अशा “फुगून बैल होऊ पाहणाऱ्या बेडकांच्या” विधानावर जास्त लक्ष देण्याची गरज नसल्याचे भाजपा शहराध्यक्ष पंडितराव देशमुख म्हणाले.



