18.7 C
New York
Wednesday, June 17, 2026

Buy now

spot_img
spot_img

पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेवर आणण्यासाठी श्वेता ताईंना मोठ्या मताधिक्याने विजयी करा…….चंद्रशेखर बावनकुळे

चिखली(बुलढाणा दर्पण):  केंद्रातील पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार देशाला वेगाने प्रगतीपथावर नेत असून, महाराष्ट्रात सुद्धा महायुतीच्या राज्य सरकारने राज्याच्या विकासाला गती दिली आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या सरकारचे विकासकार्य तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत प्रभावीपणे पोहोचवा आणि राज्याचा हा विकास रथ असाच गतिमान राखण्यासाठी पुन्हा एकदा महायुतीचे सरकार सत्तेवर येण्याची गरज आहे. त्याकरिता श्वेताताई यांना पुन्हा विधानसभेत पाठवण्यासाठी मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याकरिता कंबर कसा, असे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी केले.चिखली विधानसभेच्या आमदार सौ. श्वेताताई महाले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित, चिखली विधानसभा मतदारसंघातील पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यास मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

गेल्या पाच वर्षात भारतीय जनता पक्ष व परिवार तसेच क्षेत्रातील सर्वच संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी समर्थ साथ दिल्यामुळे मी मतदारसंघाच्या विकासात योगदान देऊ शकले याबद्दल मी सर्वांचे ऋण व्यक्त केले. अशीच साथ या निवडणुकीच्या काळात व पुढे देखील सर्वांकडून मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करत आगामी विधानसभा निवडणुकीला आपण सर्वजण आत्मविश्वासाने व उत्साहाने सामोरे जाऊया, आपला विजय निश्चित आहे, असा विश्वास आमदार श्वेताताई महाले यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मांटे, महेश लोणकर, बुलढाणा तालुका अध्यक्ष एड. मोहन पवार, प्रदेश कार्यकारणी सदस्य विजय कोठारी, सुरेशअप्पा खबुतरे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा, तालुका व शहर पदाधिकारी, विविध आघाड्या आणि सेलचे पदाधिकारी, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख तसेच कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Related Articles

ताज्या बातम्या