23.5 C
New York
Wednesday, June 17, 2026

Buy now

spot_img
spot_img

काँग्रेसला भगदाड :प्रभाग 14 मध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपात पक्षप्रवेश.

मोदीजी व देवेंद्रजी फडणवीस यांच्या विकास धोरणाला पाठिंबा द्या….आ.श्वेता महाले

काँग्रेसला भगदाड :प्रभाग 14 मध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपात पक्षप्रवेश..

नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या बाजूने अन्यपक्षीय कार्यकर्त्यांचा ओढा सुरूच असून प्रभाग क्रमांक 14 मधील काॅर्नर बैठकीदरम्यान काँग्रेसचे कार्यकर्ते कैलास खराडे व त्यांच्या मित्रपरिवाराने भाजपात जाहीर पक्षप्रवेश केला.

या कार्यक्रमाला चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ.श्वेता महाले पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती लाभली. नवप्रवेशितांचे स्वागत करताना त्यांनी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाच्या मार्गावर असलेल्या नेतृत्वाचा विशेष उल्लेख केला.

आमदार महाले म्हणाल्या की,“ महायुती सरकारने दिलेल्या विकासकामांचा वेग आणि पारदर्शक कार्यपद्धतीमुळे सर्वसामान्यांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे. चिखली शहरालाही हा विकास मिळवून द्यायचा असेल, तर स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपाची सत्ता आवश्यक आहे.”

त्यांनी भाजपाच्या नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार पंडित दादा देशमुख तसेच नगरसेवक पदासाठीचे उमेदवार मोहित व्यवहारे व अश्विनी जाधव यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.

बैठकीस भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व नागरिक उपस्थित होते. प्रभागातील या पक्षप्रवेशामुळे निवडणूक वातावरणाला चालना मिळाल्याचे स्थानिक राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

Related Articles

ताज्या बातम्या