उद्या रेणुका नगरी चिखली मध्ये देवाभाऊंची विजय गर्जना घुमणार.
मुख्यमंत्री साहेबांची सभा चिखली भाजपासाठी ठरणार निर्णायक..!
स्थानिक स्वराज्य संस्था नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने भाजपा नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार श्री.पंडितराव देशमुख यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांची जाहीर सभा राजा टॉवर चिखली येथे संपन्न होणार आहे.
एकंदरीत बघता ऐन हिवाळ्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रनधुमाळीत, चिखली शहरातील राजकीय वारे चांगलेच तापले आहेत.
चिखली नगरपालिकेची निवडणूक ही चौरंगी होताना दिसत असून, चारही पक्षांच्या वतीने प्रचार दौरे, कॉर्नर सभा ठिकठिकाणी संपन्न होताना दिसत आहे. चिखली भाजपाच्या वतीने लढत असलेले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पंडितराव देशमुख यांच्यासाठी आमदार श्वेता महाले यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे. त्या स्वतः प्रत्येक वार्डामध्ये प्रचार रॅली पासून ते कॉर्नर बैठकापर्यंत अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने विकासाचा मुद्दा घेऊन प्रचार करीत आहे.
त्यातच उद्या मंगळवारी संपन्न होत असलेली मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची विराट सभा निवडणुकीच्या निमित्ताने अत्यंत महत्त्वाची समजली जात असून भाजपाने विजयाच्या दिशेने आपले पहिले पाऊल टाकल्याचे चित्र स्पष्ट होताना दिसत आहे, अशा चर्चा चिखली शहराच्या विविध भागातून ऐकण्यात येत असून, भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये संपन्न होणाऱ्या सभेमुळे नवचैतन्य दिसून येत आहे.



