चिखलीच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये आमदार श्वेताताई महाले यांच्या उपस्थितीत भव्य प्रचार रॅली संपन्न…
योगीराज संत गजानन महाराज यांच्या मंगलमय आरतीने प्रचार रॅलीला सुरुवात..
शाश्वत विकासासाठी भाजपचे नगरध्यक्षासह सर्व उमेदवार ताकदीने निवडून आना…आ.श्वेता महाले
भाजपा चिखली न. प नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार पंडितराव देशमुख तथा प्रभाग क्रमांक 3 मधून नगरसेवक पदाचे उमेदवार सौ. कौशल्या महादेव शिंगणे तथा शेख रफिक कादर, यांच्या प्रचारार्थ चिखली मतदारसंघाच्या आ. सौ श्वेता महाले पाटील आणि नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार पंडितराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत आज प्रचार रॅली संपन्न झाली.
भाजप हा पक्ष समाजातील सर्व घटकांसाठी काम करणारा आणि न्यायाची तथा समानतेची संधी निर्माण करणारा पक्ष आहे. त्यामुळेच प्रभाग क्रमांक तीन मध्ये शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आणि मूलभूत गरजांच्या पूर्ततेसाठी कधीही निधी कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन यावेळी आमदार सौ.श्वेता ताई महाले पाटील यांनी दिले.
प्रभाग क्रमांक तीन मध्ये अद्ययावत आणि डिजिटल शाळा होणार असून यासाठी प्राथमिक शाळेची नवीन इमारत बांधकाम तथा शिक्षण क्षेत्रातील ही शाळा मॉडेल ठरावी,आणि सर्वसामान्य घरातील शाळकरी मुलांना अद्ययावत शिक्षण मिळावे, ही बाब लक्षात घेऊन युद्ध स्तरावर काम पूर्ण होत आहे.
या प्रभागातील पिण्याच्या पाण्याची अडचण येऊ नये, यासाठी नवीन जलकुंभ या ठिकाणी बांधण्यात येणार आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून भारतीय जनता पक्ष व महायुती सरकार नेहमीच कार्यरत असल्याचे मत यावेळी आमदार श्वेता महाले यांनी व्यक्त केले.
प्रभाग क्रमांक 3 मध्ये प्रचार रॅली पोहोचल्यानंतर येथील नागरिकांनी ठीक ठिकाणी रांगोळ्या काढून व पुष्पवृष्टी करत, आ.सौ.श्वेता महाले तथा उमेदवारांचे औक्षण करून वाजत गाजत स्वागत करण्यात आले.
जनता ही काम करणाऱ्या उमेदवारासोबत असते विकासाला प्राधान्य देते आणि याच पद्धतीचे आशादायक चित्र यावेळी प्रभाग क्रमांक तीन मध्ये दिसून आले.



