वाढदिवस ‘भाऊजींचा’…. थट्टा मात्र ‘भाऊंची’..
काल 31 ऑगस्ट रोजी चिखली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी फेसबुक लाईव्ह करून जी काही आदळआपट केली त्या आदळ आपटीमुळे ते कमालीचे ट्रोल झाले असून, राहुल बोंद्रे संपूर्ण जिल्हाभरात अनेक गोष्टीमुळे थट्टेचा विषय झाले….त्यातील काही ट्रोल्स अगदीच गमतीशीर पण राहुल बोन्द्रे यांनी सिरियस घ्यावे असे आहेतच..
हृदयाची शस्त्रक्रिया झालेल्या माणसाने आराम करावा की फक्त स्टंटबाजीसाठी धावावे..? पुन्हा यांच्या हृदयात प्रॉब्लेम आला की डॉक्टरची चूक होती हे म्हणायला हे मोकळे…!
बोर्ड लावले शैलेश गोंधणे यांनी… बोर्ड फाडले राहुल बोंद्रे यांनी… गुन्हा दाखल केला संग्राम पाटील यांनी… यांचे घटनाविरोधी असलेले बोर्ड काढून नेले मुख्याधिकारी यांनी.. यांच्यावर कर्ज आहे याची कागदपत्र दिली जिल्हा बँकेने… यांनी कर्ज बुडवले असं पत्र आलं होतं डी डी आर ऑफिस कडून….. भाऊंनी फेसबुक लाईव्ह करून लाखोली वाहिली, चॅलेंज केल विद्याधर महाले यांना…. काही लॉजिक दिसत आहे का?
यांनी जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांना चॅलेंज करायला होतं किंवा हायकोर्टाकडून यांना जो निकाल प्राप्त झाला आहे तो निकाल सार्वजनिक करायला हवा होता.. नाहीतर शैलेश गोंधणे यांना ओपन डिबेट साठी चॅलेंज करायला हवा होता…. यांनी चॅलेंज केलं विद्याधर महाले यांना..
अशा अनेक बाबी एका मागोमाग एक घडत गेल्या त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आयोजित कार्यक्रम महाले दाम्पत्याला चॅलेंज करून संपवावा लागला.
व आज एक सप्टेंबर रोजी विद्याधर महाले यांचा वाढदिवस त्यांना सबंध चिखली मतदारसंघ भाऊजी म्हणून ओळखतो…. महाले साहेब या वाढदिवसाला काही आले नाहीत… परंतु भाऊजींची थट्टा करण्याची वऱ्हाडी पद्धत असल्याने आज त्यांची थट्टा होईल असे वाटले होते…. पण भाऊंच्या फेसबुक लाईव्ह नंतर फेसबुक वर आणि इतर माध्यमातून येणारे व्हिडिओ व कमेंट्स पाहून भाऊंची थट्टा झाल्याची दिसून येते…



