कोण विद्याधर महाले? ते या सगळ्यांच्या मागे विद्याधर महाले…!
सहा वर्षात दिग्गज ‘राहुल बोंद्रे’ यांच्या भूमिकेत बदल घडवून आणणाऱ्या विद्याधर महाले यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा
साधारणता सहा वर्षांपूर्वी सध्या चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार असलेल्या श्वेता महाले पाटील जिल्हा परिषद सदस्य होत्या. आणि पुढील 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाच्या संभाव्य सहा-सात उमेदवारांमध्ये त्यांचे नाव होते. त्याप्रसंगी आमदार असलेले राहुल बोंद्रे यांनी इंजीनियरिंग कॉलेजमध्ये घेतलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये, पत्रकाराने महाले यांच्या संभाव्य उमेदवारीबाबत प्रश्न विचारला असता, कोण विद्याधर महाले? असे मिश्किल उत्तर दिले होते..!
त्यानंतर चिखली विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे महाले दाम्पत्यांनी जनतेच्या आशीर्वादाच्या बळावर एवढ्या स्पष्टपणे बदलली की, 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजातील दिग्गज नेत्यांची भक्कम फळी( श्री नरेंद्र खेडेकर, सौ.रेखाताई खेडेकर, सौ. ज्योती खेडेकर, विष्णू पाटील,एम.आय. एम.,वंचित बहुजन आघाडी व इतर..)घेऊन पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरलेले राहुल बोंद्रे विरुद्ध, विकास व सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद यांच्या बळावर पुन्हा निवडणूक लढवण्यासाठी सज्ज असलेल्या श्वेता महाले आणि साहजिकच एक कार्यक्षम अधिकारी व एक दूरदृष्टी असलेला प्रशासक म्हणून ख्यातीप्राप्त व तरुणांच्या गळ्यातील ताईत झालेले देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय विद्याधर महाले अशी निवडणूक पार पडली आणी कार्यक्षम नव्या दमाची हिंदू समाजातील नवी कार्यकारणी घेऊन निवडणुकीला सामोरे गेलेल्या श्वेता महाले निवडून आल्या. एवढे दिग्गज पक्ष आणि नेते राहुल बोन्द्रे यांच्या सोबत असतानाही कमी फरकाने का होईना श्वेता महाले निवडून आल्या!हा जनता जनार्दनाने त्यांना दिलेला आशीर्वाद होता हे माजी आमदार राहुल बोंद्रे यांना अद्यापही मान्य होत नाहीये.
आज सहा वर्षानंतर माजी आमदार राहुल बोंद्रे यांची फेसबुक लाईव्ह पाहताना त्यांनी किमान दहा वेळा विद्याधर महाले यांचे नाव घेतले असे लक्षात आले. त्यामुळे सहा वर्षांपूर्वी कोण विद्याधर महाले? असे विचारणारे राहुल बोंद्रे… तीन वर्षांपूर्वी विद्याधर महाले यांची बदली किंवा बरखास्तीसाठी साठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रचंड प्रयत्न करणारे राहुल बोन्द्रे… ते आमच्या सोबत घडणाऱ्या सर्व गोष्टींसाठी जबाबदार विद्याधर महाले हा प्रवास माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्यासाठी निश्चितच मनस्ताप वाढवणारा असेल….
माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या फेसबुक लाईव्ह वरून मुख्यमंत्र्यांची खाजगी सचिव असलेले विद्याधर महाले यांचे राजकीय वजनही लक्षात येते…. चिखलीतील सर्व समाजांना समाजातील युवकांना विकासाची एक दृष्टी व दृष्टिकोन देणाऱ्या विद्याधर महाले यांना निखळ अराजकीय भूमिकेतून बुलढाणा दर्पण तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा….



