चिखलीमध्ये “भाऊ कर्ज भरा”, तर भाऊकडून पोस्टर ‘टराटरा’…
माजी आमदार ‘भाऊ’ यांच्या आणि त्यांच्या ‘माजी समर्थकांची गल्लीतली भांडणे’ वाढत चालल्याने, चिखलीमध्ये राजकीय तमाशा पाहायला मिळत असून त्यातून चिखलीकर यांना मात्र मनोरंजनाचे मोठे साधन उपलब्ध झाले आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त एका मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते.परंतु या मॅरेथॉनला “मी धावतो वोटचोरी रोखण्यासाठी” असे नाव दिले होते. कदाचित राहुल बोंद्रे यांना चिखली मतदारसंघात सुद्धा वोटचोरी झाली असे सुचवायचे असेल,या मॅरेथॉनचा राहुल बोंद्रे यांच्या सोशल मीडिया सेल कडून भरमसाठ प्रचारही करण्यात आला.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दृष्टिकोनातून वर्चस्व वाढवण्यासाठी आणि हर्षवर्धन सपकाळ यांना नवीन हॅशटॅग पुरवण्यासाठी सुरू केलेले ‘मॅरेथॉन अभियान’ पोस्टर फाड अभियानात बदलले.

या मॅरेथॉनच्या पूर्वसंध्येला संपूर्ण चिखली शहरांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी असलेल्या शैलेश गोंधणे यांच्याकडून ‘ जोरात धावा सूतगिरणीने केलेली नोट चोरी रोखण्यासाठी! मी धावतो शेतकऱ्यांच्या हक्काची बँक चोरी करून! कारखाने बँका बुडवून झाल्या आता धावाधाव कशासाठी! भाऊ! टाका ना हो भरून…! थोडे धावा शेतकऱ्यांच्या खोट्या कर्जमाफीचे पैसे परत देण्यासाठी! थोडे दावा शेतकऱ्यांच्या हक्काच्या जिल्हा बँकेला न्याय देण्यासाठी! भाऊ! खरंच देऊन टाका ना हो! असा आशय असलेली अनेक बॅनर्स चिखलीच्या सर्व दर्शनी भागात लावण्यात आलेली होती.
सकाळी जेव्हा मॅरेथॉनच्या तयारीसाठी काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे,शहराध्यक्ष,माजी नगराध्यक्ष व इतर काँग्रेस पदाधिकारी बाहेर पडले तर त्यांच्या तोंडासमोर सर्व चिखलीत हे बॅनर लागलेले दिसले. माजी आमदार राहुल बोंद्रे यांचे अभियान बूमरँग होऊन त्यांच्यावरच आदळले,आणि माजी आमदार व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी हे सर्व बॅनर टराटरा फाडून टाकले….
राहुल बोंद्रे व त्यांच्या समर्थकांनी,शैलेश गोंधणे यांनी पैसे खर्च करून व रीतसर परवानगी घेऊन लावलेले बॅनर फाडून टाकले यामुळे शैलेश गोंधणे यांनी रीतसर पोलीस तक्रार दाखल केली आहे. परंतु भाऊंनी गल्लीतल्या भांडण्यासारखे स्वतः उतरून बॅनर फाडून टाकने, व त्यानंतर आता विरोधकांच्या कार्यक्रमातही आम्ही असाच गोंधळ करणार अशी अप्रत्यक्ष धमकी असलेला व्हिडिओ बनवून टाकने हे कितपत योग्य आहे? की हे फ्रस्ट्रेशन आहे?
याबाबत चिखलीत चर्चा सुरू झाली आहे…



