4.2 C
New York
Thursday, April 9, 2026

Buy now

spot_img
spot_img

सवना जिल्हा परिषद सर्कल मध्ये पूजा ताई गजानन जाधव यांच्या नावाची जोरदार चर्चा……!!

जिल्हा परिषद सर्कल मधील सर्वसामान्य मतदारांची समाजकारणात अग्रेसर असणाऱ्या नव्या चेहऱ्यांना पोलमध्ये पसंती

बुलढाणा जिल्ह्यामध्ये राजकीय राजधानी म्हणून चिखली मतदारसंघ हा सर्व दूर प्रचलित आहे. आता या राजकीय राजधानी मध्ये पुढे होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये निकाल देखील पाहण्याजोगा असणार आहे.

निवडणुका या हायटेक झाले आहे तसेच जग ग्लोबल झाल्यामुळे मतदारांना मोबाईल मध्येच सर्व परिस्थिती कळल्याशिवाय राहत नाही. जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुका तोंडावर असताना चिखली मतदारसंघातील सवना सर्कलमध्ये इंटरनेटवर प्रसिद्ध असणाऱ्या स्ट्रॉ-पोलमार्फत एक सर्वे घेण्यात आला.

आपल्याकडे कुठलीही निवडणूक असो स्ट्रॉ – पोलच्या माध्यमातून व्हर्च्युअल जगाची सफर मतदारांना आपसुकच घडते, अशातच चिखली मतदारसंघाच्या राजकारणासह जिल्हाभराचे राजकारण ज्या जिल्हा परिषद सर्कलने हाताळले, त्या सवना जिल्हा परिषद सर्कल मधील मतदारांचा ऑनलाईन संपन्न झालेला मतदान सर्व्हे सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.

डिजिटल झालेला मतदार सुद्धा पार्श्वभूमी बघूनच मतदारांना आपली पसंती दर्शवितात. अशातच अल्पावधीमध्येच समाजकारणात आपल्या कार्याची छाप सोडणाऱ्या सौ. पूजा गजानन जाधव ज्या गणराज्य फाउंडेशन महाराष्ट्राच्या अध्यक्ष आहेत. त्यांनी मतदारांच्या पसंती मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.

गणराज्य फाउंडेशनच्या माध्यमातून जनसेवेचा वसा उचललेल्या सौ पूजा गजानन जाधव या सध्या मतदारांच्या पोलमध्ये प्रथम पसंतीचा विषय ठरला असून मतदानात त्या सध्या आघाडीवर आहेत. सौ पूजाताई जाधव यांनी आपल्या लग्नामध्ये अनावश्यक असलेला सर्व खर्च वगळून तो खर्च विद्यार्थ्यांच्या अभ्यासिका निर्माण करण्यासाठी खर्च केला. त्यांच्या याच अभ्यासिकांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनी आपले भविष्य निर्माण केले. तसेच विविध अंगी समाज उपयोगाच्या कार्यामुळे गणराज्य फाउंडेशन हे कायम चर्चेत राहिले आहे.

सवना जिल्हा परिषद सर्कल मध्ये निवडणूक लढलेले दिग्गज तसेच या मतदार संघाची राजकीय संरचना बघता हा मतदार संघ तेवढाच जटील भासतो. अनेक राजकीय दिग्गजांनी या मतदारसंघांमध्ये लढूनच जिल्ह्याच्या राजकारणाची धुरा सांभाळली आहे. मतदारांच्या समस्या सोडवण्यासाठी अग्रेसर असणारे उच्चशिक्षित उमेदवार म्हणून मतदारांची प्रथम पसंती सौ पूजा गजानन जाधव यांना मतदारांच्या पोलमधून मिळाली आहे. मात्र याच पोल चा आधार घेतला असता पूजा गजानन जाधव यांच्या इतकेच तुल्यबळ उमेदवार म्हणून विनायक सरनाईक तसेच भारतीय जनता पक्षाच्या किसान आघाडीचे तालुकाध्यक्ष दिगांबर पाटील यांच्याकडे पहिल्या जात आहे.

तसेच बरेच सामान्य नागरिक स्मार्ट फ़ोन चा वापर करत नसल्यामुळे त्यांच्यापर्यंत हा पोल पोहोचला नसल्याची शक्यता आहे यामुळेच या पोल मधे काँग्रेसचे नेते रामभाऊ जाधव व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉक्टर संतोष वानखेडे याना पोलमध्ये तितकासा प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून येत आहे, मात्र त्यांचा राजकीय अनुभव देखील पाहता त्याना या सर्कल मध्ये दुर्लक्षित करून चालणार नाही..परंतु सर्कल मधील जनसंपर्क व नागरिकांचा प्रतिसाद बघता पूजा गजानन जाधव यांनी त्यांची उमेदवारी मजबूत केल्याची दिसून येत आहे… हा पोल त्यांच्या अथक समाजकार्याची पावतीच या पोल सर्वेला म्हणावे लागेल.

Related Articles

ताज्या बातम्या