25.3 C
New York
Sunday, June 21, 2026

Buy now

spot_img
spot_img

क्या सब गोलमाल है?  मेहकर नगर परिषदेच्या रेकॉर्ड रूमला आग!…

क्या सब गोलमाल है?

मेहकर नगर परिषदेच्या रेकॉर्ड रूमला आग!…

मेहकर येथील नगर परिषदेच्या रेकॉर्ड रूमला आग लागून नगरपरिषदेचे जवळपास सर्व महत्त्वाची कागदपत्रे या आगीत जळून भस्मसात झाल्याने अतोनात नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. मेहकर येथील अग्निशामक विभागाची गाडी तांत्रिक बिघाडामुळे दुरुस्तीसाठी बाहेर ठिकाणी पाठवण्यात आल्यानंतर आणि नगर परिषदेच्या माध्यमातून बऱ्याच जणांनी माहिती अधिकारात बरीच माहिती मागवली असल्याच्या महत्त्वाच्या मुहूर्तावर नगरपरिषदेच्या रेकॉर्ड रूमलाच आग लागल्याने “घ्या आता माहिती!!” अशी साधारण परिस्थिती निर्माण झाली आहे. मागे तहसील कार्यालयातील रेकॉर्ड रूमलाही आग लागून महत्त्वाची बरीचशी कागदपत्रे जळून भस्मसात झाली होती, त्याच पार्श्वभूमीवर नगरपरिषदेच्या रेकॉर्ड रूमलाही आग लागून कागदपत्रे जळून खाक झाली…. आता कोणती कागदपत्रे जळून खाक झाली? कोणती वाचली? आणि त्यातून जनतेला कोणती माहिती मिळणार? या सगळ्या बाबी आणखीन मोठ्या गुलदस्त्यात आहे… या आगीचे कारण? याला जबाबदार कोण? या सगळ्यांची चौकशी होण्यासाठी किमान पाच वर्षे थांबावे लागेल असे मेहकर मधील ज्येष्ठ पत्रकारांची म्हणणे आहे. त्यामुळे एखादे प्रकरणत तापल्यानंतर शासकीय कार्यालयातील रेकॉर्ड रुमला आग कशी लागते हे एक कोडे आहे.

Related Articles

ताज्या बातम्या