25.3 C
New York
Sunday, June 21, 2026

Buy now

spot_img
spot_img

उबाठा शिवसेनेच्या ट्रॅक्टर मोर्चाचा उडाला फज्जा….

उबाठा शिवसेनेच्या ट्रॅक्टर मोर्चाचा उडाला फज्जा….

शेतकरी आले नाही म्हणून कर्मचारीच बनवले शेतकरी…

 एखादा मुद्दा कितीही संवेदनशील असला तरीही वेळ चुकली की कशी फजिती होते हे आज समस्त बुलढाणा करांना अनुभवता आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन केले होते. मुळात शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या या मोर्च्यामध्ये शेतकरी कुठेच दिसला नाही.परंतु बऱ्याच कर्मचाऱ्यांचा त्रासिक चेहऱ्यातील वावर मात्र दिसून येत होता.मे महिन्याचा प्रचंड उकाडा, आपल्या तालुक्यापासून फॉर्च्युनर ने मोर्चापर्यंत आलेल्या नेत्यांचा पूर्ण मेकअप मधील ट्रॅक्टर मोर्चा चा फोटोसेशन लूक, व आपल्या नेत्यांना चांगलेच ओळखून असलेली जनता तसेच नवीन पदे मिळाल्यानंतर प्रसिद्धी मिळवण्याची झालेली घाई व नियोजनात झालेला ढिसाळपणा यामुळे या ट्रॅक्टर मोर्चाचा पुरता बोजवारा झालेला दिसला. शेतकऱ्यांच्या नावाने काढण्यात आलेल्या या ट्रॅक्टर मोर्चाच्या विरोधात शहरातील काही जाणत्या मंडळींनी स्वयंस्फूर्तीने, “शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्यासाठी असे मोर्चे काढले जातात” असेही स्टेटस बऱ्याच व्हाट्सअप वर ठेवलेले दिसले. मुळात शेतकऱ्यांच्या नावाने आणि शेतकऱ्यांसाठी मोर्चा कधी? कुठे? आणि कसे काढायचे? याचे ट्रेनिंग रविकांत तुपकर यांच्याकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांनी घ्यावे अशाही चर्चा बऱ्याच ठिकाणी रंगलेल्या दिसल्या.

Related Articles

ताज्या बातम्या