20.4 C
New York
Sunday, June 21, 2026

Buy now

spot_img
spot_img

बुलढाण्याच्या “पृथ्वीराज” ची अभिमानास्पद कामगिरी.. राष्ट्रीय शालेय रायफल स्पर्धेत जिंकले “कांस्य” पदक..

बुलढाण्याच्या “पृथ्वीराज” ची अभिमानास्पद कामगिरी..

राष्ट्रीय शालेय रायफल स्पर्धेत जिंकले “कांस्य” पदक..

खेळ, खेळाडू, आणी खिलाडू वृत्ती यांच्या बाबतीत अतिमागास असलेल्या बुलढाण्याच्या शिरपेचात अगदी ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या “आंधई” या गावातील श्री निंबाजी साळोख या शिक्षकाच्या मुलाने मानाचा मोरपीस रोवला आहे.

सरत्या वर्षाच्या शेवटी देशातील सर्वात स्वच्छ शहर असलेल्या मध्य प्रदेशातील इंदोर येथे राष्ट्रीय शालेय रायफल स्पर्धा पार पडल्या.या स्पर्धेमध्ये सांघिक आणि वैयक्तिक दोन्ही स्तरावर महाराष्ट्राची कामगिरी अतिशय चांगली राहिली.महाराष्ट्राला या राष्ट्रीय शालेय रायफल स्पर्धेमध्ये सुवर्णपदक प्राप्त झाले आहे.तसेच वैयक्तिक कामगिरीमध्ये पृथ्वीराज निंबाजी साळोख या विद्यार्थ्याला कास्य पदक प्राप्त झाले आहे.

पृथ्वीराज हा बुलढाण्यातील चिखली तालुक्यातील आंधई गावचा रहिवासी असून, गुरुदेव आश्रम पळसखेड सपकाळ येथील कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे.अतिशय ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या आंधई सारख्या गावातून येऊन राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या पृथ्वीराज चे समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

रायफल या खेळासंबंधी संपूर्ण प्रशिक्षण पृथ्वीराज ला चिखली येथील हालेलुजा रायफल ट्रेनिंग सेंटर इथून प्राप्त झाले, आपल्या या यशाची श्रेय पृथ्वीराज आपले आई-वडील व आपल्या ट्रेनिंग सेंटरचे कोच संतोष यंगड यांना देतो.

पृथ्वीराज च्या या यशाकडे पाहून ग्रामीण भागातील इतरही मुले खेळाकडे लक्ष देऊन देशाचा गौरव वाढवतील अशी प्रेरणा पृथ्वीराज च्या या यशाने मिळत असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये असून या यशाबद्दल पृथ्वीराज चा आंधाई व गुरुदेव आश्रम पळसखेड सपकाळ येथे सत्कार करण्यात आला आहे.

Related Articles

ताज्या बातम्या