कॉपीमुक्तीसाठी दहा शाळा व परीक्षा केंद्रे “नमुना” म्हणून निवडणार..
कॉपीमुक्त शाळा व महाविद्यालये या अभियानंतर्गत जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालये कॉपीमुक्त करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना बुलढाणा बचाव कृती समितीमार्फत पत्र देण्यात आले असून या पत्राच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रे असलेल्या शाळांना व महाविद्यालयांना या विषयाच्या संदर्भात सुचित करण्यात येणार आहे.
यावर्षी अगोदर बारावीच्या व नंतर दहावीच्या परीक्षेमध्ये कॉपी सारखे गैरप्रकार रोखण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात हे मागील वर्षी परीक्षेदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या विशाल नरवाडे यांच्यासारखे मोबाईलसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून या रोगाला आवर घालतात की “नवा गडी नवीन राज्य” याप्रमाणे काही नवीन शक्कल लढवतात हे कळेलच फक्त कॉपीमुक्तिसारखा गंभीर विषय तंत्रज्ञानाने योग्य प्रकारे हाताळण्याचा प्रयत्न करणाऱ्या विशाल नरवाडे यांना फक्त दोन पेपरच विद्यार्थ्यांना नियंत्रणात ठेवता आले होते.पण या दोन पेपरची धास्ती मुलांना प्रचंड राहिली होती हेही नाकारता येणार नाही.पहिल्या दोन पेपर नंतर विशाल नरवाडे यांनी पुन्हा त्याकडे लक्ष दिले नाही आणि त्यानंतर लगेच त्यांची बदली झाली या बाबी एकमेकांशी संबंधित आहेत का याविषयी अजूनही सर्वांमध्ये एक संभ्रम कायम आहे.
तरीही बुलढाणा बचाव कृती समितीमार्फत सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गुलाब खरात यांना दहा परीक्षा केंद्रे ही नमुना स्वरूपात प्रशासन,पोलीस व पत्रकार यांचा तिहेरी कॉम्बो करून कॉपी रोखण्यासाठी उपलब्ध करून देणार आहेत.व बाकी केंद्रावर तंत्रज्ञान वापरून कॉपी रोखण्यासाठी पाऊल उचलावे म्हणून विनंती करणार आहे.
आपल्या परिसरामध्ये खूप जास्त कॉप्या पुरवणारी,कॉप्या करू देणारी आणी टक्केवारी वाढवण्यासाठी पैसा घेणारी परीक्षा केंद्रे असतील तर त्यांची नावे आम्हाला कळवा आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी यांना त्या परीक्षा केंद्राचा समावेश प्रशासन,पोलीस व पत्रकार यांच्यामार्फत नियंत्रण या तिहेरी कॉम्बो साठी सुचवू.



