25.3 C
New York
Sunday, June 21, 2026

Buy now

spot_img
spot_img

दीपक ही नहीं बचा तो बाती का क्या करोगे!….हिंदु समाजामध्ये जातविरहित रोटी बेटी व्यवहार झाला पाहिजे ….. राणा सोमेश इंगळे.

दीपक ही नहीं बचा तो बाती का क्या करोगे!

अगर हिंदू धरम ही नहीं बचा तो जाती क्या करोगे..!!

छत्रपती संभाजीनगर येथे कॅबिनेट मंत्री नामदार अतुल सावे यांचा नागरी सत्कार सोहळा सकल राजपूत समाज व शिवराणा सेवा संघ यांच्या वतीने आयोजित केला होता त्याप्रसंगी बोलतांना राणा सोमेश इंगळे यांनी सकळ हिंदू बांधवांना प्रतिपादन केले की “हिंदूसमाजामध्ये रोटी व्यवहार आहे. पण बेटी व्यवहार नाही” तात्कालीन समाज व्यवस्थेला आवश्यक असल्याप्रमाणे हिंदू धर्मामध्ये वर्णांची व्यवस्था केलेली होती परंतु ही वर्ण व्यवस्था कर्मावर आधारलेली होती कालांतराने तिला जातीचे विकृत स्वरूप प्राप्त झाले. आणि त्यामुळे जगातील सर्व धर्मांचे मूळस्थान असलेला हिंदू धर्म जातीपातीमध्ये विभागला गेला. या आदरणीय धर्माला त्याची सनातन अवस्था प्राप्त करून देण्यासाठी जाती जातीमध्ये असलेला दूरावा कमी करणे गरजेचे आहे.त्याकरिता पहिले पाऊल म्हणजे सकल हिंदू बांधवांनी एकमेकांशी हिंदू या एका धार्मिक नात्यानेच वैवाहिक नातेसंबंध करायला हवेत व जातीचा पडदा दूर करायला हवा. जेणेकरून हिंदू धर्माची मूळ शिकवण सामाजिक व्यवस्था मजबूत करेल व जाती जातीमध्ये असलेली श्रेष्ठ व कनिष्ठत्वची भावना लयाला जाईल.

आपण एकमेकांसोबत धार्मिक वैवाहिक व्यवहार केला पाहिजे व जातीय बंधने दूर केली पाहिजे असे प्रतिपादन श्री इंगळे यांनी केले जेणेकरून येणारी पिढी मुळजात शोधण्याचा प्रयत्न करणार नाही,हिंदू समाज जाती जाती मध्ये दुभांगाल्या गेला तर जातीय द्वेष भविष्यात सुद्धा चिरंतर राहीलच,धर्म,समाज व देश बळकट करण्याकरिता अशा उपायाची सद्य परिस्थितीत प्रचंड गरज असल्याचे ते म्हणाले.

खंदो से बडी छाती नहीं होती!

धरम से बडी कोई जाती नहीं होती!

दीपक ही नहीं बचा तो बाती का क्या करोगे!

अगर हिंदू धरम ही नहीं बचा तो जाती क्या करोगे..!!

Related Articles

ताज्या बातम्या