20.4 C
New York
Sunday, June 21, 2026

Buy now

spot_img
spot_img

पवार पाडळी मध्ये “टाकी चोरीला गेली आहे?”

“पवारांची पाडळी” आणी ग्रामसेवक ‘गवळी’…..

बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील पाडळी या गावामध्ये 16 कोटी रुपयांची जलजीवन मिशन अंतर्गत नळ योजना सुरू करण्यात आली.या योजनेअंतर्गत होत असलेल्या कामांमध्ये बऱ्याचशा त्रुटी असून, पाण्याचा मूलभूत प्रश्न मिटवण्यासाठी करण्यात आलेल्या या कामांमध्ये पाडळी या गावापाडळी या गावात नवीन टाकी बांधण्यातच आलेली नाही.हे वृत्त बुलढाणा दर्पणने काही दिवसापूर्वी प्रकाशित केले होते.या अनुषंगाने बुलढाणा दर्पणने तेथील उपसरपंचच जयेश पवार आणि पाडळी ग्रामपंचायतआणि पाडळी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक श्री गवळी यांच्याशी संपर्क केला असता काही धक्कादायक खुलासे ग्रामसेवक गवळी यांनी केले आहेत.

ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक यांना आपल्या गावाच्या हद्दीमध्ये होणाऱ्या योजनेविषयी कल्पना नाही ही पन्नास वर्षांपूर्वी असलेली स्तिथी अद्याप या गावामध्ये अस्तित्वात असून, ग्रामसेवक गवळी यांना खरोखरच जल जीवन मिशन अंतर्गत आपल्या गावात करावयाची कामे, त्या कामाचे अंदाजपत्रक, त्या कामासाठी खर्च करावयाची रक्कम आणी त्या रकमेतून साध्य करावयाची भौतिक साध्ये याबाबतीत काहीच माहिती नसल्याचे ते सांगतात आणि हात वर करतात.या योजनेच्या साध्या अंदाजपत्रकाविषयी त्यांना विचारले असता मी ठेकेदार राणे यांच्याशी बोलतो आणि नंतर तुम्हाला सांगतो असे उत्तर त्यांनी दिले.

आपल्या गावात होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या योजनेमधे अंदाजपत्रकामध्ये नवीन टाकी समाविष्ट आहे की नाही?एवढी साधी गोष्ट सुशिक्षित आणि योग्य प्रशिक्षण घेतलेल्या ग्रामविकास अधिकारी असलेल्या ग्रामसेवकाला माहीत नसणे ही पूर्ण प्रशासनाला लाज आणणारी बाब आहे!याबाबतीत मुख्य कार्यकारी अधिकारी बुलढाणा जिल्हा परिषद यांच्या स्तरावरून योग्य ती कार्यवाही करणे अपेक्षित असताना इथे “तेरी भी चूप मेरी भी चुप” असा कार्यक्रम सुरू असल्याचे दिसून येत आहे.

पवार पाडळी या एका गावातच टाकीचा घोळ एवढा वाढत चालला आहे की यावरून विहीर चोरीला गेली आहे या गोष्टीची आठवण होत आहे.पवार पाडळी मधील टाकी चोरीला गेली आहे असे फलक काही दिवसात दिसू नयेत म्हणजे झाले!

Related Articles

ताज्या बातम्या