आ. सिद्धार्थ खरात अवैध व्यवसाय थांबवणार का?दारू,चेंगड,गंजीपत्ता,मटका,गुटखा…आणी सडणारी तरुणाई!
मेहकर तालुक्यामध्ये असलेल्या हजारो समस्यांचा पाढा निवडणुकीमध्ये वाचून काढणाऱ्या आमदार सिद्धार्थ खरात हे निवडणुकीनंतर बरेचशे रिलॅक्स झालेले दिसतात.मुंबईमध्ये त्यांच्या घरी आलेल्या त्यांच्या काही कार्यकर्त्यांना त्यांनी हाताने जेवण बनवून खाऊ घातले याचा व्हिडिओ फेसबुकवर त्यांनी प्रकाशित केला.जेवण बनवणे हा त्यांचा छंद आहे इथपर्यंत ठीक आहे…
आता मेहकर बस स्थानक लवकरात लवकर कसे तयार होईल यासंबंधी संबंधित कंत्राटदाराला धारेवर धरणे हे त्यांचे काम असले पाहिजे.मेहकर तालुक्यातून जल जीवन मिशन अंतर्गत काम झालेल्या अनेक गावांमध्ये या कामासंबंधीत अनेक तक्रारी प्राप्त होत आहे यावर सिद्धार्थ खरात काय करतात? हेे पहावे लागेल.मेहकर व डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत प्रचंड प्रमाणात अवैध दारूचा व्यवसाय चालतो, सोबतच गंजीपत्ता, चेंगड,चक्री वरली, आणी अशा अनेक अनैतिक,अवैध व्यवसायामुळे संपूर्ण मेहकर तालुका आणि तालुक्यातील तरुणाई नासवली जात आहे याकडे लक्ष वेधण्याचे काम आमदार सिद्धार्थ खरात करतील अशी आशा आहे.
आता महाराष्ट्र सरकार हे महायुतीचे बनले त्यामुळे आम्हाला काही जास्त कामे राहिली नाहीत!असा गोड गैरसमज आमदार सिद्धार्थ खरात यांचा होत असेल तर त्यांनी आपल्या “स्वयंपाककलेवर” अधिक लक्ष दिले तरी चालेल. कारण मेहकर मधील जनता आता कोणताही “बिनकामी” माणूस आता अधिक काळ सहन करणार नाही असाच संदेश या निवडणुकीमधून मिळाला आहे.



