4.2 C
New York
Thursday, April 9, 2026

Buy now

spot_img
spot_img

चिखली बुलढाण्याची जनता लबाड? लालची? की मजबूर ? गावात हजार हजार बांधकाम मजूर पण बांधकामाला मजूर मिळेेना!

चिखली बुलढाण्याची जनता लबाड? लालची? की मजबूर ? गावात हजार हजार बांधकाम मजूर पण बांधकामाला मजूर मिळेेना!

सरकारी नोकरी करणाऱ्या पुरुषांच्या फुल मेकअप बायकांनी सुद्धा लाटल्या “पेट्या” आणी भांड्यांच्या “संसारकीट”

राज्य शासनाने बांधकाम कामगार यांच्यासाठी सुरु केलेल्या योजनेंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील एकट्या चिखली तालुक्यामध्ये 92,000 हजार बांधकाम कामगार असल्याची नोंदणी लोकांनी केली आहे.एकूण जवळपास 65,000 पेक्षाही कमी कुटुंबे असलेल्या चिखली तालुक्यामधे,आणी 3,00,000 पेक्षा कमी मतदार असलेल्या चिखली तालुक्यातील एकूण 30% पेक्षाही अधिक जनता ही बांधकाम कामगार म्हणून काम करीत असल्याची धक्कादायक माहिती संख्यिकीवरून लक्षात येत आहे.संपूर्ण जगातील सांख्यिकीचा विचार करता कोणत्याही देशात तीन टक्के पेक्षा जास्त बांधकाम व्यावसायिक व बांधकाम कामगार असूच शकत नाही अशा स्थितीत फक्त चिखली तालुक्यामध्ये एकूण मतदार संख्येच्या 30% पेक्षा जास्त लोक बांधकाम कामगार म्हणून काम करीत करीत असल्याने, शेतकरी शेतमजूर,व्यापारी आणि नोकरीवर असलेले लोकही शेती,व्यापार आणी नोकरी सांभाळून बांधकाम कामगार या सामाजिकदृष्ठ्या अतिशय खालचा स्तराचा रोजगार मानल्या जात असलेल्या प्रारंभिक, प्राथमिक व्यवसायाकडे वळली असावीत असा संशय निर्माण होत आहे.

ज्या गावांमध्ये पंचवीस ते पन्नास खरे बांधकाम मजूर असतील त्या गावामध्ये हजार हजार पेट्या व भांड्यांच्या संसारकीट वाटप करण्यात आल्या आहेत.अगदी नोकरी करणाऱ्या पुरुषांच्या फुल मेकअप व टी व्ही. सिरीयलबाज महिलांनीदेखील बांधकाम मजूर म्हणून नोंदणी केल्याचे दिसून येत आहे. ज्यांना बांधकामाला काय साहित्य लागते? हे सुद्धा माहिती नाही बांधकाम कामगार म्हणून अशा अनेक लबाडांनी आपली नोंदणी करून घेतली असल्याचे लक्षात येत आहे.या खोट्या बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यासाठी त्यांना आवश्यक कागदपत्रे पुरविणारे ग्रामसेवक, कंत्राटदार, ठेकेदार व अभियंते यांच्यावर शासकीय कार्यवाई करण्यात आली पाहिजे.सोबत यामध्ये अनेक एजेंट कार्यरत झालेले आहेत त्यामुळे खोटे दाखले व खोटे क्लेम करणारे व करून देणारे यांची माहिती बुलढाणा दर्पण लवकरच प्रकाशित करणार असून यासाठी बुलढाना बचाव कृती समिती जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार असल्याचे समितीमार्फत सांगण्यात आले.

Related Articles

ताज्या बातम्या