4.2 C
New York
Thursday, April 9, 2026

Buy now

spot_img
spot_img

खरडपट्टी…… दोघांच्या भांडणात “लाभ” शोधणाऱ्या रविकांत तुपकरांची..

नामदार प्रतापराव जाधव व आमदार संजय गायकवाड यांच्यामध्ये या आठवड्यात काही मतभेद झाल्याचे दिसून आले.या दोघांच्या भांडणात रविकांत तुपकर यांनी उडी घेत आ. संजय गायकवाड यांचे समर्थन केले होते.त्या अनुषंगाने ज्येष्ठ पत्रकार देशोन्नतीचे जिल्हा प्रतिनिधी श्री राजेंद्र काळे यांनी रविकांत तुपकर यांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे ….त्यांच्याच शब्दात पण थोडक्यात..

आज संजूभाऊ अन् प्रतापराव यांच्यात मतभेद झाले असतील, किंवा ते निर्माण केले जात असतील.. पण उद्या हेच संजूभाऊ अन् प्रतापराव ऐकमेकांच्या ताटात जेवतांना दिसतील. कारण शिवसेना पक्ष हा या दोघांचे घर आहे. तेंव्हा तिसर्‍या घरातले कुठे असतील? याचा विचार करा. जयश्रीताई अन् बंटीदादा ऐकमेकांशी बोलतही नव्हते, पण ताईंच्या प्रचारात बंटीदादा दोन पाऊल पुढे होते. संदीपदादा अन् मालतीताई पायाला भिंगरी लावून फिरत होते.. ही त्याची ताजी उदाहरणं. घरोघरी मातीच्या चुली असतातच, तशा त्या पक्षातही असतात. म्हणूनच रविभाऊ, अन्य पक्षात वाद चालू असतीलतर त्यावर भडकावणारं भाष्य टाळायलं हवं !

याच रविकांत तुपकरांनी सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा प्रचारात वाघाच्या शिकारीवरुन ‘नकली’ संबोधत संजय गायकवाडांवर हल्लाबोल केला होता तो शेगावच्या सभेत, गायकवाड यांनी त्याला ‘फेसबुक लाइव्ह’ करत प्रत्यूत्तर देत तुपकरांची शिकार करणार असल्याची डरकाळी फोडली होती. २०१९च्या लोकसभा प्रचारात जानेफळच्या सभेत शिंगणेंसाठी तुपकर प्रतापरावांवर घसरले होते, तेंव्हा साखरखेर्ड्याच्या सभेत गायकवाड यांनी तुपकरांची खरडपट्टी काढली होती. विषय निघाला म्हणून, तुपकरांनी जानेफळ व नंतरच्या काही सभेत प्रतापरावांवर अगदी नात्यांच्या पातळीवर जावून टिका केली होती.. मात्र प्रतापरावांनी शिंगणेकडून जेवढा टॉकटाईम टाकल्या जातो, तेवढे तूपकर बोलतात.. एवढेच बोलून प्रत्यूत्तर देण्याचे टाळले होते. तेच तुपकर नेहमी-नेहमी सांगतात, प्रतापराव तर मला पाण्यात बघतात. रविभाऊ तुम्ही त्याठिकाणी असतातर? तुम्ही काय प्रतापरावांची दुधाने आंघोळ घातली असती??.. रवीभाऊ म्हणतात की, विरोधक त्यांना विरोध करतात.. मग ते काय समर्थन करणार? बरेच विषय आहे, बात निकलेंगी तो दूरतलक पहूँचेंगी..हा शेर डॉ.शिंगणेंनी प्रचार सांगता सभेत नाझेर काझींसाठी वापरला होता, म्हणून आठवला.. आपल्याकडे ‘स्पेस’ कमी आहे. तर ज्यांना ‘नकली’ संबोधले होते, त्याच संजूभाऊंमध्ये आता तुपकरांना ‘असली’पणा दिसतो. वक्त वक्त की बात है, कालाय तस्मे: नम!

Related Articles

ताज्या बातम्या