20.4 C
New York
Sunday, June 21, 2026

Buy now

spot_img
spot_img

मेल्यानंतर पण मरण यातना देणारी शेलसूरची स्मशानभूमी…. दोष कुणाचा?ग्रामपंचायत,ग्रामसेवक की कंत्राटदार?

मेल्यानंतर पण मरण यातना देणारी शेलसूरची स्मशानभूमी….

दोष कुणाचा?ग्रामपंचायत,ग्रामसेवक की कंत्राटदार?

आपुलिया मरण पाहिले मी डोळा! सोहळा मरणाचा आज अनुभवला! मरणासारख्या शेवटच्या दुःखदाय गोष्टीलाही सोहळा बनवणारे तुकाराम महाराज यांच्यासारखे संत यांनी शेलसुर या गावातील मरण सोहळा आणी त्या मरण सोहळ्यामध्ये होणारी मृतकाची विटंबणा पाहिली असती तर त्यांनाही या बाबतीत शेलसूर वासियांची दया आली असती!

 

शेलसुर या गावांमध्ये मेलेली कुत्री आणी मेलेली मृत व्यक्ती या दोघांचाही अंतिमसंस्कार गावातील स्त्रिया शौच करायला जातात त्या ठिकाणी केला जातो.ग्रामपंचायतीला डॉ. नारायणराव देशमुख यांच्यासारख्या समाजधुरीनाने गावाच्या निकट स्मशानभूमीसाठी दिलेली जमीन असूनसुद्धा त्या ठिकाणी जाण्यासाठी ना रस्ता बनवला गेला ना स्मशानभूमी सौंदरीकरण केल्या गेले.आ. श्वेताताई महाले यांनी या स्मशानभूमीच्या सौंदर्यिकरणासाठी 15 लाख रु. एवढा निधी दिला असतांनाही हा निधी वापरून काम करवून घेणेसुद्धा ग्रामपंचायत ला जमत नसेल तर ग्रामपंचायत मध्ये लोकांनी किती “लायक” लोकप्रतिनिधी पाठवले आहेत याचा विचार करावा!

सध्या अस्तित्वात असलेल्या स्मशान भूमीमध्ये जाण्याकरता जो रस्ता आहे त्या रस्त्यावर दुतर्फा मानवी शौच केलेली असते.आणि साक्षात त्या रस्त्याचे जे हाल आहे त्यावरून अश्मयुगातील ” बुद्धीचा विकास न झालेली” मानवे येथे “ग्रामपंचायत नावाच्या गुहेत” राहत असावीत असे वाटते.

आणि या गावातील राजकीय कार्यकर्ते आपल्या नेत्याला आपल्या गावातील या “संडासयुक्त” नरकात आणण्याची लाज वाटते म्हणून बळजबरी भाऊंचा आणी ताईंचा शोकसंदेश आला आहे अश्या बढाया मारतात.खरे नालायक लोक पक्षीय कार्यकर्ते आणी सोयीप्रमाणे प्रत्येक पक्षात जाणारे लोक आहेत,ज्यांनी आपल्या राजकारणापायी आणी स्वार्थापायी गावातील अनेक चांगल्या गोष्टींचा नाश केला आहे.

गावामध्ये सैन्यातून निवृत्त होऊन आलेल्या महामानवाच्या अनुयायाला बिनविरोध सरपंच पद देण्यात आले.त्यामागे सैन्यातून आलेला माणूस हा प्रामाणिक असतो व तो शिस्तीने गावातील सर्व कामे करून घेईल हा भोळा आशावाद होताच.स्मशानभूमीचे काम पूर्ण करून सध्याच्या सरपंचांनी गावातील किमान एका मूळ प्रश्नाची तरी सोडवणूक करावी अशी आशा शेलसुरवासी अजूनही बाळगून आहेत.

संबंधित कंत्राटदार हा राजकीय कार्यकर्ता असून त्याला योग्य ती समज दुसऱ्यांदा आमदार पदी नियुक्त झालेल्या आमदार सौ श्वेता ताई महाले यांनी द्यावी अशी शेलसुरवासियांची मागणी आहे.

Related Articles

ताज्या बातम्या