पुन्हा श्वेताताईच का? पार्ट @ 2
अवघ्या अडीच वर्षाच्या काळात आमच्या ताईच्या सरकारने आम्हा स्त्रियांना स्वावलंबी बनवण्यासाठी अनेक योजना आणल्या.माझ्या घरातील महिन्याच्या तीन हजार रुपये किराण्याचे अर्धे पैसे मी देवाभाऊंची “लाडकी बहीण” भरत आहे … मला खऱ्या अर्थाने “अर्धांगिनी” बनवण्यासाठी मदत करणारे माझ्या ताईचे सरकार व आमच्यासारख्या स्त्रियांचे प्रश्न समजून घेण्यासाठी एक खंबीर आमदार श्वेताताई व ताईचे सरकारच पुन्हा पाहिजे.
आज माझ्या छोट्या छोट्या गरजांसाठी मी कोणावर अवलंबून नाही.आणी माझ्या ताईच्या सरकारने दिलेल्या या भेटीमुळे मी माझ्या मुलांच्या पोषणाचा स्तर वाढवू शकले.आज या अल्पशा मदतीमुळे का होईना माझ्या घरात माझाही विचार महत्त्वाचा मानला जातो .मला आत्मनिर्भर बनवणाऱ्या माझे स्वावलंबन वाढवणारे माझ्या ताईचे सरकार आणी मला या प्रगतीचा हिस्सा बनवणाऱ्या श्वेताताई म्हणूनच पुन्हा आमदार म्हणून हव्यात.
निवडणुकीपूर्वीच मला माझ्या ताईच्या सरकारने 7500/ रुपये माझ्या सणासाठी माझ्या स्वतःच्या खात्यात जमा करून दिले. श्वेताताईंनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी स्वतःच्या खर्चातून कॅम्प लावले होते.माझ्या गावात ग्रामदूत म्हणून आलेल्या त्या पोराने सगळी योजना आम्हाला घरीच तयार करून दिली.आणी आमच्याकडून पैसेदेखील नाही घेतले.प्रत्येक लहानसहान बाबीसाठी इकडे तिकडे चकरा मारायला न लावता माझ्या दारापर्यंत पोहचून घरीच माझे काम करून देणाऱ्या श्वेताताई ह्या यामूळेच पुन्हा मला आमदार म्हणून पाहिजेत.
आमच्या श्वेता ताईंच्या सरकारने आमच्या भल्यासाठी सुरू केलेली योजना बंद करावी म्हणून काँग्रेसणे न्यायालयात या योजनेला आव्हान दिले आहे.पुन्हा जर काँग्रेस सारखे आणी त्यांच्या सावकार माजी आमदारासारखे लोक सत्तेवर आले तर आमच्यासारख्या महिलांना पुन्हा कर्जाच्या खाईत लोटण्याचे पाप करून हे पुन्हा स्वतःच्या तुंबड्या भरण्याचेच काम करतील.माझी पिढी मी अंधारात लोटणार नाही.माझ्या पिढीला प्रकाशाची वाट दाखवणारे देवाभाऊचे सरकार व या सरकारच्या मजबूत आधार म्हणून आमदार पुन्हा श्वेताताईच पाहिजे



