16.7 C
New York
Saturday, April 11, 2026

Buy now

spot_img
spot_img

पुन्हा श्वेताताईच का? भाग @ 1

पुन्हा श्वेताताईच का? भाग @ 1

चिखली विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणुकीचे वारे अगदी जोरात वाहू लागले आहेत,प्रचार सुरु झाले आहेत,एकमेकांवार आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. संपूर्ण मतदारसंघाचा आढावा घेतला असता चिखलीच्या विद्यमान आमदार श्वेता ताई महाले याच पुन्हा आमदार म्हणून पाहिजेत असाच बराच सामाजिक कल दिसून येतो आहे.राजकीय मते काहीहि असू शकतात परंतु सामाजिक दृष्ट्या,विकासाच्या दृष्टीकोनातून व सामान्य जनतेच्या दृष्टीने भावनिक दृष्ठ्या पाहिले तर श्वेताताईच पुन्हा का? या प्रश्नांचे उत्तर पुढील काही मुद्द्यामधे समाविष्ठ असल्याचे दिसून येते.

आरोग्य:

काय असते एका आमदाराची जनतेप्रती कर्तव्यें…. अचानक आलेल्या आजारपनासारख्या संकटात आपल्या मदतीसाठी कुणीतरी येते,आणी आपल्या घरातील “आधार” कुणाच्यातरी सहकार्याने दवाखान्यातून बरा होऊन पुन्हा आपल्या घराचा आधार बनतो…ही असते खरी सेवा…आणी आरोग्य सेवा देण्याच्या बाबतीत संपूर्ण महाराष्ट्रातील अगदी बोटावर मोजण्याईतक्या आमदारांमध्ये सौ. श्वेताताई विद्याधर महाले हे नाव बरेच वर येईल. पंतप्रधान आयुष्यमान योजना व महात्मा फुले मधे सर्वांना पाच लाख रु. पर्यंतचे उपचार मोफत आहेच….पण ज्या आजारांना या योजनेमध्ये उपचार शक्य होत नाहीत,अशा मोठ्या आजार किंवा अपघात झालेल्या अनेक रुग्णांसाठी सौ. श्वेताताई महाले यांनी कधी काळ वेळ बघितला नाही व त्या सतत कार्यरत राहिल्या.

आमदार श्वेताताई महाले यांनी कोट्यावधी रु. चे उपचार अगदी मोफत आणी तेही मुंबई,पुणे ,छत्रपती संभाजीनगर येथील अगदी पंचतारांकित व सामान्य लोकांच्या अगदी कुवतीबाहेर असलेल्या दवाखान्यामध्ये अगदी मोफत करून दिले. फक्त सिनेमामध्ये वा बातम्यांमध्ये नाव ऐकलेल्या ब्रिच कॅण्डी हॉस्पिटल,जसलोक हॉस्पिटल,लिलावती हॉस्पिटल अशा अनेक ठिकाणी सौ श्वेताताई महाले यांनी चिखलीतील अगदी सामान्य घरातील पण गरजू रुग्णांना उपचार उपलब्ध करून दिले. संवेदनशील असलेल्या महाले ताईंनी भाऊ, आई, बहीण,समजून सर्वांना उपचार उपलब्ध करून दिलेत. पण ताईंनी कुणाची जात कधी विचारली नाही….

लग्न,समारंभ आणी आंनदाच्या क्षणांमध्ये सगळी नेते मंडळी येतात पण आमचा आमदार दवाखान्यात आमची गैरसोय होऊ नये म्हणून स्वतःचे सनवार न पाहता धावून येतो आणी आमच्या मुलाच्या अपघातामध्ये मला माझ्या गरिबीची जान होऊ न देता आमच्या मुलाच्या उपचाराची सर्व व्यवस्था एखाद्या कुटुंबप्रमुखाप्रमाणे करतो……हजारो रुग्णाचे प्राण वाचवून त्यांना योग्य उपचार मिळावेत म्हणून कष्टणाऱ्या आ. श्वेताताई म्हणूनच पुन्हा आमदार म्हणून पाहिजे.

सर्वसामान्य रुग्णांसाठी त्यांच्या परिवारासाठी श्वेता ताई आज एक देवदूतच बनल्या आहेत …या माऊलीचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत..पण या आभाराचीही अपेक्षा न करणाऱ्या लोकप्रतिनिधी आम्हाला लाभल्या याचा आम्हाला अभिमान आहे.श्वेताताई सारख्या आमची काळजी घेणाऱ्या उमेदवारालाच आमचे मत आहेच पण सर्वांनी यातून धडा घेतला पाहिजे की संकटे सांगून येत नाहीत पण संकटाच्या वेळेस कामी येणारे आमदार पाहिजे….सावडायला सगळे येतात..दवाखान्यात येणारी आमदार पाहिजे….म्हणून माझे मत माझ्या ताईला..माझे मत श्वेताताईला.

Related Articles

ताज्या बातम्या