आमदार श्वेताताई महाले यांनी मिळालेल्या अडीच वर्षाच्या कालावधीत मतदारसंघाच्या केलेल्या सर्वांगीण विकासामुळे अगदी सामान्य जनताही आमदार श्वेताताई महाले यांच्याशी जुळल्यामुळे ही निवडणूक श्वेताताई महाले यांना पुन्हा आमदार बनण्याकरिता अतिशय सोपी असल्याचे जनमत आहे.विकासाच्या मुद्द्यावर तरी माजी आमदार राहुल बोन्द्रे हे विद्यमान आमदार यांना टक्कर देणे शक्य नसल्याचे मत डॉ. कृष्णकुमार सपकाळ यांनी व्यक्त केले.
माजी आमदार राहुल बोंन्द्रे हे विद्यमान आमदार श्वेताताई महाले यांच्यापेक्षा पुष्कळ मागे पडल्याचे दिसून येत आहे.आ. श्वेताताई महाले यांचा बहुजन चेहरा सर्व जाती जमातीमधील मतदार यांना माजी आमदार राहुल बोन्द्रे यांच्यापेक्षा अधिक जवळचा व आश्वस्त वाटत असल्याने बहुजन आपलाच उमेदवार नक्कीच निवडतील यात कुठलीही शंका वाटत नसल्याचे डॉ सपकाळ म्हणाले.
राहुल बोन्द्रे यांच्याऐवजी डॉ. सत्येंद्र भुसारी,विष्णू पाटील कुळसुंदर किंवा ईश्वरसिंग इंगळे किंवा डॉ. ज्योती खेडेकर सारख्या निष्कलंक बहुजन चेहऱ्याला काँग्रेसणे उमेदवारी दिली असती तर या निवडणुकीमध्ये अधिक रंगत वा चुरस निर्माण झाली असती अशी चर्चा सर्वसामान्य करताना दिसत आहे.असेही वक्तव्य डॉ. सपकाळ यांनी केले.
डॉ. सत्येंद्र भुसारी,श्री विष्णू पाटील कुळसुंदर तसेच ईश्वरसिंग इंगळे यांच्यासारखे काही बहुजन चेहरे राहुल बोन्द्रे यांच्यासोबत नक्कीच फिरतांना दिसत असले तरी कदाचित निष्कलंक बहुजन चेहरा असलेल्या आ. श्वेताताई महाले यांना वेळेवर या सगळ्यांची साथ मिळेल असा कयास जाणत्यांकडून लावला जात आहे.त्यामुळे श्वेताताईंचा लीड अपेक्षेपेक्षा खूप अधिक राहील असे वाटते असेही डॉ. सपकाळ म्हणाले.



