राहुल बोंद्रे यांना राजकीय पटलावरून गायब करण्यासाठी अनेक जणांचे काटेकोर नियोजन?
राज्याचे गृहमंत्री यांनी पोलिसांनी केलेल्या दडपशाहीबददल् आणि शेतकऱ्यांच्या रक्ताने लिहिलेले निवेदन फाडल्याबद्दल शेतकऱ्यांची माफी मागावी या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केलेले जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व माजी आमदार राहुल बोंद्रे यांना तिसऱ्या दिवशी सावरगाव या ऐतिहासिक परिवर्तनाच्या दिशेने आगेकूच करत असलेल्या गावातून गाशा गुंडाळावा लागला.
माजी आमदार असलेल्या राहुल बोंद्रे यांना आपल्या आंदोलनाचा अशाप्रकारे शेवट करावा लागेल याचा अंदाजहि आला नसेल!गृहमंत्र्यांकडून माफीची अपेक्षा ठेवणारे माजी आमदार राहुल बोंद्रे,यांचा आमदार श्वेता महाले यांनी राजकीय मोर्चाच्या तालुका अध्यक्ष पदावर असलेल्या सामान्य कार्यकर्त्याकडून व शेतकरी असलेल्या दोन भावाकडून राजकीय बळी मिळवला अशी चर्चा चिखलीमध्ये रंगली आहे.
*दोन ताईंनी मिळून केला भाऊंचा गेम*
राहुल बोंद्रे यांच्या आंदोलनाचा फज्जा उडण्याचे एकमेव कारण श्वेता महाले आहेत असं म्हणता येणार नाही.तर त्याच बरोबर राहुल बोंद्रे यांचा राजकीय बळी घेण्यासाठी आघाडीतीलच राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या सौ. ज्योती खेडेकर यांनीसुद्धा प्रयत्न केले असल्याचे ऐकण्यात आहे?सावरगाव हे गाव केळवद जिल्हा परिषद सर्कल मध्ये येते.आणि केळवद जिल्हा परिषद सर्कलच्या जिल्हा परिषद सदस्य राहिलेल्या सौ. ज्योती खेडेकर यांना या गावातून त्यांच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता.सौ ज्योती खेडेकरया सुद्धा चिखली विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यास इच्छुक असून,उमेदवारीसाठी त्यांनी पुरेशे प्रयत्न सुरू ठेवलेले आहेत.राहुल बोंद्रे यांनी मागील एका महिन्याची तीन मोठे आंदोलने महाविकास आघाडीमार्फत पार पाडली,त्यापैकी कुठल्याही आंदोलनात कुठल्याही स्टेजवर सौ. खेडेकर दिसल्या नाहीत.राहुल बोंद्रे अन्नत्याग आंदोलनात बसलेले असतानाही जिल्हाभरातील सर्व महाविकास आघाडीचे नेते त्यांना भेट देऊन गेले,एक फॉर्मॅलिटी म्हणून ज्योतिताईंनी या आंदोलनाला भेट दिली पण स्वतःच्या जी.प. सर्कलमध्ये असलेल्या हक्काच्या गावात ज्योतिताईंनी जी सक्रियता दाखवायला हवी होती,ती ताईंनी दाखवली नाही अशीच चर्चा सगळीकडे होती. काही महिन्यापासून सौ खेडेकर यांनी “भावीआमदार डॉक्टर ज्योतीताई खेडेकर” या नावाचे फेसबुक पेज ओपन करून त्यावर त्याच भावी आमदार असतील असा प्रचार सुरू केला आहे.सोबतच एक आगस्ट रोजी त्यांनी मुकुल वासनिक यांची भेट घेऊन,महाविकास आघाडी तर्फे चिखली विधानसभा मतदारसंघात त्याच योग्य उमेदवार कश्या आहेत हे मुकुल वासनीक यांना पटवून दिल्याचे सांगितल्या जात आहे.

हा सर्व योगायोग आहे असे निश्चितच मानता येणार नाही!त्यामुळे सावरगाव येथील राहुल बोंद्रे यांचे अन्नत्याग आंदोलन अयशस्वी करण्यात डॉक्टर ज्योती खेडेकर यांचाही हात आहे का?हा संशोधनाचा विषय आहे!




