चिखली तालुक्यातील सावरगाव येथे शेतकऱ्यांच्या रक्ताचा अपमान झाला म्हणून, शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी, माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी गावातील शेतकऱ्यांसोबत “अन्नत्याग आंदोलन” सुरु केले होते. तर त्याच ठिकाणी, त्याच गावात भाजपाचे तालुका युवा मोर्चा अध्यक्ष संतोष काळे यांनी विवेक डुकरे व अमोल डुकरे यांच्यासोबत, माजी आमदार व जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या विरोधात अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते.
एकाच गावात, एकाच ठिकाणी दोन परस्पर विरोधी पक्षांना आंदोलनाची परवानगी देणाऱ्या सावरगाव डुकरे ग्रामपंचायत ला “अडकित्त्यामध्ये सुपारीची” भावना झाली असेल?.पण पोलीस प्रशासनाने ही अगदीच निष्क्रियता दाखवून सत्तेसोबतचा आपला करार कायम ठेवला?
माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी सावरगाव डुकरे येथे अन्नत्याग आंदोलन करणार ही भूमिका मांडल्यानंतर सत्ताधारी पक्षाने दमाने घेतले असते तरी चालले असते.पण आक्रमकता दाखवण्यासाठी भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष व त्यांच्यासोबत, राहुल बोंद्रे यांच्या विरोधात न्यायालयीन खटला सुरू असलेले दोन युवक, यांना उपोषणाला बसवून राहुल बोंद्रे यांच्या अन्नत्याग आंदोलनाला शह देण्याचा प्रयत्न केला गेला.
सावरगाव डुकरे या एकाच गावात अगदी काही मीटरच्या अंतरावर दोन विरोधी पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन घोषणाबाजी,कार्यकर्ते जमवणे वगैरे प्रकार सुरु झाले.या असल्या आंदोलनामध्ये, या गावात काही अनुचित प्रकार घडला असता तर त्याचा सर्वस्वी दोष कुणाला द्यायचा? गरिबांच्या साध्या भोळ्या मुलांना “अंधभक्त” बनवून त्यांचा वापर आपल्या राजकीय कृतीसाठी करणे, व त्यांच्या बलिदानावर आपली राजकीय पोळी शेकून घेणे, हीच सत्ताधारी राजकीय पक्षांची खेळी असते.ईश्वर या सर्वांना सद्बुद्धी देवो अशी प्रार्थना आपण करू असेही राहुल बोन्द्रे म्हणाले.

आपल्यामुळे या ऐतिहासिक गावात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, कुठल्याही गरीबाचा विनाकारण राजकीय बळी जाऊ नये, राजकारण करण्याकरता शंभर मार्ग उपलब्ध आहे, परंतु भावनेच्या या राजकारणात एखाद्या आईनं तिचा “लेक गमावला” तर त्याची जबाबदारी कोणी घ्यायची?सत्ताधारी पक्षाने आमच्या आंदोलनात व्यत्यय आणण्याचा प्रामाणीक प्रयत्न केला,सावरगावच्या क्रांती भूमीतून सुरु झालेला हा संघर्ष आता प्रत्यक्ष मैदानात उतरून करू आणी एक लाख शेतकऱ्यांच्या रक्ताच्या सह्यांचे निवेदन राज्यपाल यांना देऊ असे राहुल बोन्द्रे यांनी घोषित केले.
अंगात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत शेतकऱ्यांसाठी आम्ही लढत राहू, पण सोयाबीनची कापनी सुरूू झाली आहे, वरून पावसाने शेतकऱ्यांची फजिती लावलेली आहे.अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना साथ देणे ऐवजी त्यांना येथे गुंतवून ठेवणे योग्य ठरणार नाही.त्यामुळे आमच्या अन्नत्याग आंदोलनाची आम्ही आज स्थगिती करत आहोत असे माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांनी सांगितले.



